शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना दिली समज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 13:58 IST

५ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली, काजळंबा, खरोळा गावातील उघड्यावर शौचवारी करण्याºयांना गुड मार्निंग पथकाने समज दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा हगणदरीमुक्त झाला असला तरी ग्रामीण भागात उघड्यावरच शौचवारी सुरू असून, उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित करण्यात आले. ५ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली, काजळंबा, खरोळा गावातील उघड्यावर शौचवारी करण्याºयांना गुड मार्निंग पथकाने समज दिली.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्रशासनाने १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झालेला आहे. कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झाला असला तरी उघड्यावरील शौचवारी थांबता थांबेना, असेच काहीसे चित्र दिसून येते. शौचालय बांधकाम झाल्यानंतरही नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याची बाब निदर्शनात येत आहे. या पृष्ठभूमीवर गुड मॉर्निंग पथक पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाने शुक्रवारी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली, काजळंबा, खरोळा गावाला सकाळच्या सुमारास भेटी दिल्या. यावेळी उघड्यावर शौचवारी करणाºयांना समज देऊन सोडून देण्यात आले. त्यानंतरही कुणी उघड्यावर शौचवारी करताना आढळून आले तर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद