लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: तालुक्यातील रामतीर्थ येथे शनिवार, २४ जूनच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी परशराम चव्हाण यांच्या घरात प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यांसह ९४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामतीर्थ येथील परशराम चव्हाण यांच्या घरी शनिवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील दोन लोखंडी पेट्या चोरून नेल्या. गावानजीक असलेल्या शेतात त्या पेट्या फोडून त्यातील ७४ हजार रुपयांचे दागिने, रोख १८ हजार रुपये यासह इतर साहित्य असा ९४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मानोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विश्वास वानखडे, जमादार सुभाष महाजन, हरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यासंदर्भात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
सोन्याच्या दागिन्यांसह ९४ हजारांचा ऐवज लंपास!
By admin | Updated: June 25, 2017 09:00 IST