कारंजालाड : अज्ञात मोटारसायकल स्वारांनी १ लाख रूपये किंमतीची महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविल्याची घटना २२ मे रोजी दुपारी ४.३0 च्या सुमारास स्थानिक शेतकरी निवासजवळ घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोर्यातील देशमुख नगर येथील विद्या मुरलीधर गायकवाड या ४५ वर्षीय महिलेची दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी गळ्यातील १ लाख रूपये किंमतीची ४५ ग्रॅमची सोन्याची पोथ झटका मारून पळविली.या घटनेने गांग़रून गेलेल्या सदर महिलेने नंतर पोलिसस्टेशन गाठून तेथे फिर्याद नोंदविली. महिलेच्या फिर्यादीवरून पोलीसांनी कलम ३९२, ३४ भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली
By admin | Updated: May 24, 2014 01:18 IST