शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

काचा फुटल्या, खिडक्या तुटल्या; सांगा कसे राहावे कोविड सेंटरमध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:12 IST

Washim News : पावसाळ्यात खोलीमध्ये पाणी येण्याचा धोका असून, यामुळे कोरोना रुग्णांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरातील कोविड केअर सेंटर असलेल्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या असून, काचाही फुटल्या आहेत. पावसाळ्यात खोलीमध्ये पाणी येण्याचा धोका असून, यामुळे कोरोना रुग्णांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी इमारतींची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे.पहिल्या लाटेत सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या जिल्ह्यातील निवासी शाळा व वसतिगृहाच्या इमारती कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आल्या. पहिली लाट ओसरल्यानंतर आपसूकच कोविड केअर सेंटरचे दरवाजेही कुलूपबंद झाले. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने सवड (ता.रिसोड), सुरकंडी (ता.वाशिम), सिव्हिल लाईन वाशिम, मंगरूळपीर, कारंजा येथे कोविड केअर सेंटरचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. कोविड केअर सेंटरमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरची व्यवस्था नाही. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत अंधारातच रहावे लागते. सवड व सुरकंडी येथील कोविड केअर सेंटरच्या इमारती बऱ्यापैकी आहेत. मात्र, अन्य ठिकाणच्या इमारतींची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक ठरत आहे. वाशिम येथील सिव्हिल लाईनस्थित कोविड केअर सेंटरच्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या तर काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वादळवाऱ्यासह पाऊस आला तर थेट खोलीत पाणी शिरते. यामुळे रुग्णांची तारांबळ उडते. संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जात असल्याने पावसाळ्यात इमारतींमध्ये पाणी शिरणार नाही, याची दक्षताही घेणे आवश्यक ठरत आहे.

आठ कोविड सेंटरमध्ये २०० रुग्णजिल्ह्यात आठ कोविड सेंटर असून, या सेंटरमध्ये २०० रुग्ण दाखल असून, पावसाळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून इमारती सुसज्ज ठेवणे आवश्यक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोविड केअर सेंटरच्या इमारती आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील संस्थात्मक विलगीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या इमारतींची पाहणी करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस