शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गायीच्या गोठ्यातील चार विषारी सापांना एकाच वेळी पकडून दिले जीवदान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 23:07 IST

वाशिम: गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून वावरत असलेल्या घोणस जातीच्या (रसेल वायपर) विषारी सापांना वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडत जंगलात सोडून जीवदान दिले.

वाशिम: गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून वावरत असलेल्या घोणस जातीच्या (रसेल वायपर) विषारी सापांना वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडत जंगलात सोडून जीवदान दिले. हा थरारक प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथे सोमवारी असंख्य ग्रामस्थांनी पाहिला.मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील लाठी येथील शेतशिवारात शेतकरी मनोहर सुर्वे यांच्या गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून सापांचा वावर मनोहर सुर्वे यांना आढळून आला. त्यामुळे गायीच्या गोठ्यात ठेवलेला कडबा काढताना जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी ही बाब मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या वाईल्डलाईफ कंझर्वेशन चमूतील सहकाºयांना कळविली. त्यानंतर गौरव कुमार इंगळे आणि त्यांचे सहकारी श्रीकांत ढापसे, शुभम ठाकूर, कुणाल ठाकूर आणि उमेश पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना सदर साप हे घोणस (रसेल वायपर) या अतिशय विषारी जातीचे असल्याचे स्पष्ट झाले.प्रत्यक्षात शेतात आढळणारे साप पकडणे हा प्रकार वन्यजीव रक्षणाच्या प्रकारात मोडत नाही, कारण सापांचा वावर हा शेतात असतो आणि हा प्राणी शेतक-यांसाठी फायद्याचाही आहे; परंतु संबंधित शेतकºयाच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या थरारानंतर या चारही सापांना पकडून सुखरूप जंगलात सोडले. हा थरार असंख्य ग्रामस्थांनी अनुभवला. -------------समागम काळामुळे घोणस सापांचा वावरहिवाळा हा घोणस जातीच्या सापांचा समागमाचा किंवा मिलनाचा काळ आहे. या दिवसांत या सापांच्या जोड्या विशेष ठिकाणी काही दिवस दडून बसतात आणि समागम झाल्यानंतर ही जोडी विभक्त होते. याच कारणामुळे लाठी येथे एकाच वेळी घोणस जातीचे चार साप आढळून आले. लाठी येथील शिवारात आढळलेल्या चार सापांपैकी एक मादी जातीचा, तर तीन नर असल्याचे गौरव कुमार इंगळे यांठनी सांगितले.