----
गावांच्या मुख्य रस्त्यांवर उकिरडे
मंगरुळपीर: तालुक्यातील ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे उकिरडे साफ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
----
पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय
मंगरुळपीर : गेल्या आठवडाभर आलेल्या पावसामुळे तालुक्यातील धानोरा, आसेगावसह इतर अनेक गावांतील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांवर चिखल झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात साहित्य नेण्यात अडचणी येत आहेत.
--------------
गावागावांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मंगरुळपीर : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाकडून ग्रामीण परिसरातील अनेक गावांत कीड नियंत्रण आणि तण व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
-------------------
तालुक्यात पोलिसांची संख्या अपुरी
मंगरुळपीर : मंगरुळपीर पोलीस उपविभागांतर्गत १५० पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलिसांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.
-------------