शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात उडिद पिकावर गेरवा सदृष रोगाचा  प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:25 IST

वाशिम: जिल्ह्यात खरीप हंगामातील उडिदाच्या पिकावर गेरवा सदृष बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून, येत त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त.

ठळक मुद्दे पिके जोम धरू लागली असतानाच या पिकांवर किडींचा प्रकोप सुरू झाल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्रामुख्याने उडिद पिकावर गेरवा सदृष बुरशीजन्य रोगाचा आणि सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात खरीप हंगामातील उडिदाच्या पिकावर गेरवा सदृष बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून, येत त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तात्काळ बुरशीनाशक फवारणी करून या रोगावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी जवळपास पूर्ण झाली असून, जुनच्या सुरुवातीला झालेल्या पेरणीची पिके चांगली तरारली आहेत. ही पिके जोम धरू लागली असतानाच या पिकांवर किडींचा प्रकोप सुरू झाल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्रामुख्याने उडिद पिकावर गेरवा सदृष बुरशीजन्य रोगाचा आणि सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाकडून विविध तालुकास्तरावर करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान या रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. गेरवा सदृश बुरशीजन्य रोगामुळे पिक उत्पादनात घट येण्याची भिती आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. गेरवा सदृषी बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार तात्काळ किटकनाशक फवारणी करावी, तसेच सोयाबीनवरील हिरव्या उंटअळीच्या नियंत्रणााठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.सद्यस्थितीत उडीत पिकावर गेरवा सदृश्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यावर नियंत्रणासाठी तात्काळ बुरशीनाश फवारणी करून प्रबंध करावा तसेच सोयाबीन पिकावर हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.यावर नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी शेतकºयांनी करावी. बुरशीनाशक किटक नाशक विकत घेताना तज्ञांचा सल्ला घेऊन खरेदी करावे व शिफारशीनुसार फवारणी करावी. शेतकºयांना यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास कृषी विभागाकडे संपर्क केल्यास मार्गदर्शन केल्या जाउ शकते. शेतकºयांनी रोगाचा प्रादूर्भाव झाल्याबरोबर कृषी विभागाशी संपर्क करुन कीडीपासून आपली पीके वाचवावी.-जयप्रकाश लव्हाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी