शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धाग्याच्या सहा हजार रिळ वापरून केली गणेशमूर्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 18:08 IST

धाग्याच्या सहा हजार रिळ आणि लोकराचा वापर करून आकर्षक अशी गणेशमूर्ती स्थापन केली आहे

पर्यावरणपुरक उपक्रम: कारंजातील बाल हौशी गणेश मंडळाची परंपरा लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड:  गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण पुरक गणेशोत्सवाची परंपरा जपणाºया कारंजा शहरातील बाल हौशी गणेश मंडळाने यंदा या परंपरेत आणखी एक कडी जोडली आहे. त्यांनी यंदा शिवणकामासाठी वापरल्या जाणाºया धाग्याच्या सहा हजार रिळ आणि लोकराचा वापर करून आकर्षक अशी गणेशमूर्ती स्थापन केली आहे. ही मूर्ती शहरातील गणेशभाविकांचे लक्ष वेधत आहे. े दिवंसेदिवस पर्यावरणाचा ºहास होऊन त्याचे भीषण वाईट परिणाम मानवी जिवनावर होत असतानाही बदल करण्याचे प्रयत्न अपेक्षीत प्रमाणात होत नाहीत. ही बाब विविध धार्मिक उत्सवातही दिसते. तथापि, अनेक गणेश मंडळे, दुर्गोत्सव मंडळे पर्यावरणपुरक उत्सव साजरा करून समाजासमोर आदर्शही निर्माण करीत आहेत. त्यात कारंजा शहरातील भाजी बाजार परिसरातील बाल हौशी गणेश मंडळाचा समावेश आहे. हे गणेश मंडळ गेल्या २० वर्षांपासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करते. यासाठी ते निर्माल्याचे विसर्जन करताना पाणी प्रदुषित न होऊ देणे, गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषण टाळत सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य करते. यंदाही त्यांनी ही परंपरा राखत. सहा हजार रिळ आणि लोकर वापरून आकर्षक गणेशमूर्ती तयार केली. ही मूर्ती मंडळातील मूर्तीकार अमित  कºहे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी मिळून तयार केली. यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवा कºहे, उपाध्यक्ष रोहित परकोटे, सचिव मनोज देशमुख कोषाध्यक्ष सचिन विभुते, सदस्य आकाश कºहे, विजय शर्मा, चंद्रशेखर कडेल, गजानन वलीवकर, नवीन डांगुर निशांत गुलालकरी, संयम गुलालकरी, राज विभुते, शिवा ब्राह्मणे, शुभम राऊळ, स्वप्नील   बंड, प्रकल्प वैद्य, कौशल  बंड, रितेश  गुलालकरी, गुरु यवतेकर, मंगेश वैद्य, आशिष  वैद्य, सचिन  देशमुख , रितेश डांगुर, गौरव डांगुर, समीर बन्नौरे, सचिन बाखडे, गौरव सौरभ विभुते, आकाश व्यवहारे, स्वरूप कºहे तसेच सल्लागार अनंतराव कºहे, मंगेश कडेल, बाळूभाऊ यवतेकर आणि शरद कºहे आदिंनी सहकार्य केले.    एक हजार बटणचा वापरकारंजातील बाल हौशी गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी धाग्याच्या सहा हजार रिळ वापरल्या, तसेच ही मूर्ती आकर्षक करण्यासाठी त्यांनी एक हजार बटणही वापरले आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनीही परिश्रम घेत आहेत.  मूर्तीसाठी दरवर्षी नवे साहित्य गेल्या २० वर्षांपासून कारंजातील बाल हौशी गणेश मंडळ पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करीत असले तरी, एकदाही त्यांनी मूर्तीसाठी पूर्र्वीच्या साहित्याचा वापर केला नाही. कधी नारळापासून, कधी बांबूपासून, कधी पणत्यांपासून, कधी कवड्यांपासून, कधी गवतापासून, तर कधी शिंपल्यापासून त्यांनी आकर्षक अशा गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. त्यांचा हा उपक्रम इतर गणेश मंडळांसाठी आदर्श ठरणारा आहे.

टॅग्स :washimवाशिमGanesh Mahotsavगणेशोत्सव