शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:54 IST

सोमवार, २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या घोषणेसह ढोलताशांच्या गजरात सोमवार, २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत झाले. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘बाप्पां’ची हर्षोल्हासात स्थापना केली. मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतिक असणाºया गणरायांचे सोमवारी आगमन होताच गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, जागोजागी वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यांवरचे लहान-मोठे खड्डे चुकवत गणराय घरोघरी पोहोचले. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी मोठ्या संख्येने श्रींची स्थापना करण्यात आली.  सकाळच्या सत्रात घरगुती गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी वाशिम शहरातील नगर परिषद चौक मार्ग, पाटणी चौक आदी ठिकाणी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. पूजेचे साहित्य आणि गणेशमूर्तीसह मोरयाचा गजर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक या दरम्यान एका मंगल कार्यालयाजवळचा रस्ता पोलिसांनी दुचाकी वाहनांसाठी बंद ठेवला होता. गणरायांसमोर आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य खरेदीसाठी भाविकांनी स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारात एकच गर्दी केली. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीद्वारे मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवादरम्यान शांतता राखावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. वाशिमप्रमाणेच रिसोड, कारंजा, मानोरा, मालेगाव, मंगरूळपीर व ग्रामीण भागात ढोलताशांचा निनाद व मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात सर्वत्र बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. लाडक्या गणरायांच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवwashimवाशिम