शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांच्या स्मृती जपतेय ‘वाटाणेवाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:00 IST

वाशिम : विदर्भासह मराठवाडयात प्रसिध्द असलेली ‘वाटाणेवाडी’ वारकºयांचा विसावा ठरत आहे. वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा यांनी सुरू  केलेली पालखी विसाव्याची व्यवस्था आज वर्षानुवर्षांपासून अविरत सुरू ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरु आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विदर्भासह मराठवाडयात प्रसिध्द असलेली ‘वाटाणेवाडी’ वारकºयांचा विसावा ठरत आहे. वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा यांनी सुरू  केलेली पालखी विसाव्याची व्यवस्था आज वर्षानुवर्षांपासून अविरत सुरू ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरु आहे . दरवर्षी पंढरपूर, शेगावसह या रस्त्यावरुन कोणत्याही धार्मिक क्षेत्रावर जाणाºया अनेक पालख्यांमधील हजारो वारकºयांची सेवा करण्याचे कार्य वाटाणे परिवाराच्या या वाटाणेवाडीत होत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया २० पालख्या, श्री संत गजानन महाराज प्रगटदिनासाठी शेगाव येथे जाणाºया २५ पालख्या व माहूर, औढा नागनाथ, परळी वैजनाथसह इतर देवस्थानांवर जाणाºया २० पालख्यांमधील वारकरी तसेच ईतर ३० ते ४० पालख्या येथे विसावा घेऊन मगच पुढील मार्गक्रमण करतात. या मुक्कामाच्या काळात वाटाणेवाडीत त्यांच्या मुक्कामासह स्रान,चहा-पान, नाश्ता ,जेवण व इतर व्यवस्था वाटाणे परीवार कडून केल्या जाते. अकोला रोडस्थित असलेल्या वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा एका पालखीसोबत वाशिम येथे आले होते.अकोला रस्त्यावर असलेल्या वाटाणेवाडीमध्ये जाऊन त्यांनी ‘तत्कालीन (आता स्व.) दौलतराव नारायणराव वाटाणे यांना हाक मारून ‘आम्ही पंढरपुरा चाललो आहे’ असे  सांगितले. त्यावेळी दौलतराव यांनी गाडगेबाबासह त्या पालखीत सहभागी असलेल्या वारकºयांची व्यवस्था केली. तेव्हा गाडगेबाबांनी ‘हे कार्य असेच सुरू  राहू दे ’असे म्हटले.तेव्हापासून दौलतराव यांच्यानंतर हा वसा दौलतराव नारायणराव वाटाणे यांचे चिरंजिव दिनकराव वाटाणे अविरत सुरु ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपताहेत. आज मराठवाडयासह, विदर्भात अकोला रस्त्यावरील वाटाणेवाडी ‘वारकºयांचा विसावा’ म्हणून ओळखली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक