शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी कार्यालयात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:20 IST

Washim News जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयावर उमेदवार आणि विद्यार्थ्यांची गर्दी उसळत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसह विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यास वाशिम येथील जात पडताळणी कार्यालयात गर्दी करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पार फज्जा उडत असल्याचे दिसत आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची जात पडताळणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. शिवाय यंदाचे शैक्षणिक सत्र संपत आले असताना पुढील उच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयावर उमेदवार आणि विद्यार्थ्यांची गर्दी उसळत आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे; परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात त्याची फारशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र दिसत असून, कार्यालयाबाहेर खिडकीजवळ विद्यार्थी आणि उमेदवारांची मोठी रांगच लागत आहे. कार्यालय प्रशासनाच्या सूचनेनंतरही फिजिकल डिस्टन्सिंगची दखल घेतली जात नाही. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची धडपडविद्यार्थ्यांना येत्या ३० डिसेंबरपर्यंत जात पडताळणी प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी लगबग सुरू असून, प्रामुख्याने वैद्यकीय अभ्यासक्रम, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठी धडपड होत आहे. 

ग्रामपंचायत उमेदवारांची लगबग३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत असून उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची प्रत जोडणे आवश्यक आहे. यासाठी अवघे पाच दिवस उरले असल्याने उमेदवारांची लगबग सुरू आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्राकरीता प्रस्ताव दाखल करण्यास उमेदवारांसह विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत; परंतु प्रस्ताव दाखल करणाऱ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे मुळीच पालन केले जात नाही.-छाया कुलाल,जात पडताळणी उपआयुक्त, वाशिम

टॅग्स :washimवाशिम