शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

जवान तस्लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:50 IST

‘अमर रहें, अमर रहें, तस्लीम भाई अमर रहें’च्या घोषणांच्या निनादात  या वीरास निरोप देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड :   केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) जवान तस्लीम सलीम मुन्नीवाले यांच्यावर शुक्रवारी (१७ जानेवारी) रोजी येथील बायपास जवळच्या मुस्लिम कब्रिस्थान येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रशासनाच्यावतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर उसळला होता. ‘अमर रहें, अमर रहें, तस्लीम भाई अमर रहें’च्या घोषणांच्या निनादात  या वीरास निरोप देण्यात आला.        येथील गवळीपूरा मधील मूळ रहिवासी तस्लीम मुन्नीवाले हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) मध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असताना मंगळवार, १४ जानेवारी रोजी सहकारी कर्मचाºयाने गोळी झाडून त्याची हत्या केली होती. सेवा बाजावतांना मृत्यू झाल्याची बातमी मिळाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली होती. मागील दोन दिवसांपासून सर्व तरुण मंडळी सर्व व्यवहार बंद ठेवून अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते. जम्मू काश्मीर येथून १६ जानेवारीच्या रात्री विमानाने जवान तस्लीम चे पार्थिव नागपुरात दाखल झाले. त्यानंतर अमरावती मार्गे पार्थिव कारंजा आणण्यात आले. सर्वप्रथम मुन्नीवाले कुटुंबियांच्या घरी पार्थिव काही वेळ ठेवण्यात आले. त्य नंतर मुस्लिम विधीनुसार नमाजे जनाजा अदा करण्यात आली. तसेच अंतिम दर्शनकरिता कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवरामध्ये पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये अंतीम यात्रा काढण्यात आली. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) व जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. नागरिकांनी स्वयंफुतीर्ने आपली प्रतिष्ठाने तसेच सर्व व्यवहार बंद ठेऊन यात्रेत सहभाग नोंदवला.  नगरपालिकेची सर्व शाळांना बंद ठेवण्यात आली होती.नागरिकांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रद्धांजली वाहिली. या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटणी, काँग्रेस नेते मो.युसूफ पुंजानी, नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाड़े,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, नायब तहसीलदार विनोद हरणे,ठाणेदार एस.एम.जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदराजंली वाहिली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. जवान तस्लीम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वधर्मीय हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा