शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

८५ ग्रामपंचायत भवनसाठी निधी मिळाला; बांधकाम केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 11:54 IST

Funds received for 85 Gram Panchayat Bhavan : ग्रामपंचायतींचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीतून सुरू असून पावसाळ्याच्या दिवसात ‘दप्तर’ सांभाळताना ग्रामसेवकांची कसरत होत आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   जिल्ह्यातील १०२ पैकी ८५ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारतींसाठी (ग्रामपंचायत भवन) शासनाकडून निधी मिळून सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप बांधकामाला सुरुवात नाही. स्वतंत्र इमारतीअभावी या ग्रामपंचायतींचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीतून सुरू असून पावसाळ्याच्या दिवसात ‘दप्तर’ सांभाळताना ग्रामसेवकांची कसरत होत आहे.जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, १०२ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर अन्य कर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वसूल केले जातात. स्वतंत्र इमारती नसल्याने या ग्रामपंचायतीचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जतन करताना ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची गैरसोय होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही ठिकाणी इमारतीत पाणी गळती होत असल्याने महत्त्वाचे दस्तऐवज भिजण्याची भीतीही कर्मचाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नसल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. स्वतंत्र इमारत व परिसरात नसल्याने मासिक सभा, ग्रामसभा नेमक्या कुठे घ्याव्यात, असाही पेच निर्माण होतो. जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारतीसाठी निधी मिळावा, याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. डिसेंबर २०२० मध्ये ८५ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाला शासनाकडून मंजुरी मिळाली तर फेब्रुवारी २०२१ दरम्यान निधी मिळाला. परंतु, अद्याप बांधकामाला सुरुवात होऊ शकली नाही. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, असे सांंगण्यात येत आहे.

८५ ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामांना मंजूरी व निधी मिळालेला आहे. तालुकास्तरीय यंत्रणेकडे निधी सुपूर्ददेखील करण्यात आला. लवकरच बांधकामाला सुरूवातदेखील होईल.-  विवेक बोंद्रेप्रभारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwashimवाशिम