शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा अभियानांतर्गतच्या निधीची प्रतिक्षा संपुष्टात;  जिल्हास्तरावर लवकरच मिळणार निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 16:46 IST

वाशिम - सर्व शिक्षा अभियानांतर्गतचा केंद्र व राज्य शासनाचा दुसºया टप्प्यातील जवळपास १९१.४२ कोटींचा निधी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे वितरित करण्यास २६ फेब्रुवारीला मान्यता दिली.

ठळक मुद्देविविध कार्यक्रम व उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने हा निधी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला प्राप्त होत असल्याने काही उपक्रम व कार्यक्रम ऊधारीवर राबवावे लागतात तर शाळांची बांधकामे, दुरूस्ती व अन्य कामे निधी प्राप्त झाल्यानंतर करावी लागतात.शालेय शिक्षण विभागाने २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गतच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे.

वाशिम - सर्व शिक्षा अभियानांतर्गतचा केंद्र व राज्य शासनाचा दुसºया टप्प्यातील जवळपास १९१.४२ कोटींचा निधी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे वितरित करण्यास २६ फेब्रुवारीला मान्यता दिली. हा निधी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाकडे वितरीत केला जाणार असल्याने निधीची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे.दर्जेदार शिक्षणाला चालना देणे, मुलभूत शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देणे, शालेय शिक्षण व्यवस्थापनात पंचायती राज संस्था, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समिती, पालक-शिक्षक संघटना, माता-शिक्षक संघटना, जमातींच्या स्वायत्त परिषदा यांना प्रभावीरित्या सहभागी करून घेण्याचा प्रयत्न तसेच विविध कार्यक्रम व उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे. विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधी हिस्स्याचे प्रमाण ६०:४० असे आहे. टप्प्याटप्प्याने हा निधी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला प्राप्त होत असल्याने काही उपक्रम व कार्यक्रम ऊधारीवर राबवावे लागतात तर शाळांची बांधकामे, दुरूस्ती व अन्य कामे निधी प्राप्त झाल्यानंतर करावी लागतात. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील दुसºया टप्प्यातील निधीची प्रतिक्षा शिक्षण विभागाला होती. केंद्र शासनाने ७ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या आदेशान्वये केंद्र शासनाच्या हिस्स्याच्या दुसºया टप्प्याचा ११४.८५ कोटींचा निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा केला होता. राज्य शासनाच्या हिस्स्याचा ७६.५७ कोटी रुपये निधी आता उपलब्ध झाला असून, केंद्र व राज्य शासनाचा एकत्रित १९१.४२ कोटी रुपये निधी शालेय शिक्षण विभागाने २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गतच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. या निधीतून विविध उपक्रम व कार्यक्रम, बांधकामे, सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, सहायक अनुदाने (वेतनेतर) आदींचा खर्च भागविला जाणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद स्तरावर आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर त्या-त्या जिल्ह्याच्या मागणी प्रस्तावानुसार निधीचे वितरण केले जाणार आहे. वाशिम जिल्ह्याला आतापर्यंत जवळपास ६० टक्के निधी मिळाला असून, ४० टक्के निधीची प्रतीक्षा होती. आता दुसºया टप्प्यातील केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळाल्याने उर्वरीत ४० टक्के निधीही लवकरच मिळेल, अशी अपेक्षा वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व्यक्त केली.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र