शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात वृक्ष लागवडीचे ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:31 IST

कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड  (वाशिम) :  सन २०१६ पासून महाराष्ट्र शासनाच्यावतीने वृक्षलागवड कार्यक्रमाला विशेष महत्व देण्यात आले असून या अंतर्गत राज्याला ३३ कोटी वृक्षलागडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अनुषंगाने सन २०१९-२० या वर्षाकरिता कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. उद्दिष्ट पुर्तीसाठी ३ आठवडे एवढा अवधी शिल्लक असून तोपर्यंत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असा विश्वास वनविभागाच्यावतिने व्यक्त करण्यात आला. मागील काही दिवसांत राज्यातील वृक्षाचे प्रमाण कमी झाल्याने ग्लोबल वार्मिंगसारखी समस्या जन्माला आली. यामुळे वातावरणात सतत बदल होत असून तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने राज्यात वृक्षलागवड कार्यक्रमाला एक महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून घोषित केले. या कार्यक्रमा अंतर्गत राज्यात सन २०१६ मध्ये १ जुलै या एका दिवसात २ कोटी, सन २०१७ मध्ये १ जुलै ते ७ जुलै ते या काळात ४ कोटी, सन २०१८ मध्ये १ ते ३१ जुलै यादरम्यान १३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली असून सन २०१९ साठी १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या काळात राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  या अनुषंगाने कारंजा वनपरीक्षेत्र. कार्यालय, समाजिक वनीकरण विभाग व इतर विभागाच्या वतीने कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून याकरिता वनविभागाच्या वतीने रोपवाटप करण्यात आले. १ जुलैपासून वृक्षलागवडीस प्रारंभ करण्यात आला. दरम्यान कारंजा वनपरीक्षेत्र कार्यालयाला १ लाख २७ हजार ४०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत सदर कार्यालयाच्या वतीने १०० टक्के उद्दिष्टपुर्ती झाली आहे. शिवाय सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनेही उद्दिष्ट पुर्ण करण्यात आले आहे. परंतु तालुक्यातील इतर प्रशासकीय विभागाच्या वतीने मात्र अद्यापपर्यंत उद्दिष्टपुर्ती न करण्यात आल्याने उद्दिष्टपुर्तीचा आकडा ७० टक्क्यांवर थांबला आहे. पुढील तीन आठवड्यात अद्यापपर्यंत रोप न नेणाºया प्रशासकीय विभागाने कारंजा वनपर्यटन केंद्रातून रोपे नेउुन वृक्षलागवड करावी तसेच वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपुर्तीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद इढोळे यांनी केले आहे.  सन २०१९-२० या वर्षाकरिता कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्षलागवडीचे उद्ष्टि देण्यात आले आहे. आजपर्यंत तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून उर्वरित उद्दिष्टही लवकरच पूर्ण करण्यात येईल- अरविंद इढोळेवनपरिक्षेत्र अधिकारी, कारंजा

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम