शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींची कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी ‘रोहयो’ची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 15:03 IST

वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या

ठळक मुद्देपुन्हा सुरु करावयाच्या धडक सिंचन विहिरी आता ३० जून २०१८ जून पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे.संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी वेळोवेळी सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या मुदतीत विहिरींची कामे पूर्ण करून घेण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाची धडपड सुरू आहे. मात्र, उद्भवलेल्या विविध स्वरूपातील अडचणींमुळे त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जवाहर धडक सिंचन विहिर योजनेतील विहिरी, नरेगातून धडक सिंचन विहीर योजनेत वर्ग करण्यात आलेल्या विहिरी व रद्द केलेल्या विहिरींपैकी पुन्हा सुरु करावयाच्या धडक सिंचन विहिरी आता ३० जून २०१८ जून पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. या विहिरी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी वेळोवेळी सुचना देखील देण्यात आल्या आहेत. संबधित लाभार्थी शेतकºयांनी मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन आपल्या अपूर्ण तसेच अद्याप सुरु न झालेल्या धडक सिंचन विहिरी ३० जून पूर्वी पूर्ण करून तसा अहवाल प्रशासनाकडे सादर करावा, असे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी केले. ६,१३० विहिरींची कामे झाली पूर्ण!जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात ६ हजार १३० विहिरींची कामे पूर्ण झाली असून उर्वरित विहिरींची कामे येत्या ३० जूनपर्यंत निश्चितपणे पूर्ण केली जातील. त्यादृष्टीने ‘रोहयो’चे सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय