शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग योजनेचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा -  जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:04 IST

पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सर्व तालुका कृषि अधिकारी यांना दिल्या. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फळबाग लागवडीला चालना देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२०-२१ मध्ये १७२० हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सर्व तालुका कृषि अधिकारी यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात ३ नोव्हेंबर रोजी आयोजित कृषि विभागाच्या विविध योजना तसेच ‘आत्मा’ नियामक मंडळाच्या आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांच्यासह संबंधित विभागांचे शासकीय अधिकारी, अशासकीय सदस्य, सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, इतर पिकांच्या तुलनेत फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील काही क्षेत्रात फळबाग लागवड करावी, यासाठी, कृषि विभागाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृषि सहाय्यकाने त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान १० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून ते पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावे. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला असून त्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमcollectorजिल्हाधिकारी