नेहरू युवा केंद्राचा पुढाकार : स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने ४० युवतींना एक महिना कालावधीचे शिलाई मशिनचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन पोलीस निरीक्षक मोनाली गुल्हाणे यांच्या हस्ते १३ सप्टेंबरला झाले.युवतींना स्वयंरोजगाराचे धडे देण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. शिलाई मशिनच्या माध्यमातून सुशिक्षित तसेच बेरोजगार युवतींना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने कामरगाव येथे एक महिना कालावधीचे मोफत शिलाई मिशन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा ४० युवतींनी सहभाग घेतला आहे. १३ सप्टेंबरला पार पडलेल्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मिना भोने, प्रा. विशाल ठाकरे, विनोद नंदागवळी, शाम लवठे, नेहरू युवा तालुका समन्वयक आशिष धोंगडे, प्रशिक्षका रिना उमाळे यांची उपस्थित होती. रिना उमाळे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
४० युवतींना शिलाई मशिनचे मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:29 IST