शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून नेत्र रुग्णांना मोफत सेवा; इंझोरीच्या डॉक्टरचा आदर्श उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 18:06 IST

इंझोरी (वाशिम) :  गोरगरीब नेत्ररोग्यांना उपचाराची दिशा कळावी, त्यांचा खर्च वाचावा या उदात्त हेतुने इंझोरी येथील डॉ. प्रकाश खानबरड हे गेल्या १० वर्षांपासून मोफत तपासणी सेवा देत आहेत.

- नरेश आसावा इंझोरी (वाशिम) :  गोरगरीब नेत्ररोग्यांना उपचाराची दिशा कळावी, त्यांचा खर्च वाचावा या उदात्त हेतुने इंझोरी येथील डॉ. प्रकाश खानबरड हे गेल्या १० वर्षांपासून मोफत तपासणी सेवा देत आहेत. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेत कमी खर्च व्हावा म्हणून मार्गदर्शनही करीत आहेत. आजवर त्यांनी ९७० रुग्णांची मोफत तपासणी करून विविध ठिकाणी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया सेवेची सोयही करून दिली आहे.डॉ. प्रकाश खानबरड हे गेल्या १२ ते १४ वर्षांपासून इंझोरी परिसरात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करतानाच त्यांनी गत १० वर्षांपासून मोफत नेत्र तपासणीचा उपक्रम सुरू केला आहे. गोरगरीब लोकांना डोळ्यांच्या आजाराची माहिती आणि त्याची गंभीरता कळत नाही. आजार बळावल्यास अनेकांवर अंध होण्याची वेळही येते. त्यातच आजाराची दिशा कळत नसल्याने अनेक जण व्यर्थ खर्च करीत असतात. ही बाब टाळली जावी आणि नेत्ररोग्यांना मोफत तपासणीद्वारे आजाराचा प्रकार आणि प्रमाण कळावे, यासाठी विविध ठिकाणच्या रु ग्णांना तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहनही ते करतात. या तपासणीसाठी दिवस निश्चित करून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करतात आणि उपचारासाठी मार्गदर्शन करतात. गेल्या १० वर्षांत त्यांनी परिसरातील ९७० रुग्णांची मोफत तपासणी केली आहे. यंदाही २० डिसेंबर रोजी त्यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेतले. या शिबिरात शंभरपेक्षा अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदकि शोर तोतला, ग्रामचेतना मंडळाचे अध्यक्ष राजकुमार दिघडे, प्रकाश राठोड, चंदू शहा, संदीप देवघरे यांनी सहकार्य केले. रुग्णांच्या नेत्रतपासणीसाठी डॉ. जाधव, त्र्यंबक लेन्डे यांनी मदत केली.

टॅग्स :washimवाशिमdoctorडॉक्टर