शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘कन्टेनमेंट झोन’मध्ये पोलिसांसमोर नागरिकांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:13 IST

यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मात्र गप्पामध्ये मश्गुल होते.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला परिसर सील केल्यानंतर त्या परिसरात (कन्टेंनमेंट झोन) लावण्यात आलेल्या कठडयाच्या खालून नागरिक मुक्तसंचार करीत असल्याचे ३० जून रोजी दुपारी दिड वाजताच्या दरम्यान दिसून आले. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मात्र गप्पामध्ये मश्गुल होते.वाशिम शहरातील अनेक भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण पॉझिटीव्ह आलेला परिसर नगरपरिषदेच्यावतिने सील करण्यात आला आहे. सील करण्यात आलेल्या परिसरात पोलीस कर्मचारी कर्तव्यावर ठेवण्यात आले आहेत. सील केलेल्या परिसरात कोणीही येवू जावू नये याकरिता ही व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांपासून किंवा या परिसरात जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू नये याकरिता ही खबरदारी घेण्यात आली आहे. परंतु येथील चित्र वेगळेच दिसून आल्याने सील केलेला परिसर केवळ नावापुरताच असल्याचे दिसून आले.वाशिम शहरातील अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर असलेल्या घरकुलामधील एक महिला पॉझिटीव्ह आढळून आली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील काही जणांना क्वारंटीन कक्षात दाखल करण्यात आले व सदर परिसर सील करण्यात आला .येथे पोलीस कर्मचारी २४ तास कर्तव्यावर रहावा याकरिता छोटासा तंबु उभारुन देण्यात आला आहे. येथे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर तर दिसून येत आहे, परंतु सील करण्यात आलेल्या परिसरात कोणी जात आहे, येत आहे याकडे त्यांचे दुर्लक्ष दिसून आले.सील केलेल्या परिसरात नागरिक पोलीस कर्मचाऱ्यांसमोरुन लावण्यात आलेल्या कठडयांच्या खालून त्या परिसरात शिरत आहे. परंतु या पोलीस कर्मचारी त्यांची साधी विचारणा सुध्दा करताना दिसून येत नाही.

सील करण्यात परिसरातील रहिवाश्यांचा समावेशसील करण्यात आलेल्या परिसरात त्याच भागात राहणारे नागरिक बिनधास्तपणे येणे जाणे करताना दिसून येत आहेत. सील परिसर करण्यात आल्यानतर त्या नागरिकांना आत बाहेर करीत असतांना कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी अटकाव करीत नसल्याचे दिसून आले.

संध्याकाळच्यावेळी अनेकजण घराबाहेरअकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सील करण्यात आलेल्या परिसरामधून संध्याकाळच्यावेळी अनेकजण बाहेर पडत असल्याचे या परिसरानजिक राहिलेल्या नागरिकांनी सांगितले. पोलीस अधिक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष देवून हा प्रकार वेळीच थांबविणे गरजेचे असल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या