शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

तीन हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 16:34 IST

जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी पुढाकार घेऊन १९ एप्रिलपासून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय जैन संघटना जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने १९ एप्रिलपासून सुरू केलेल्या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत २५ एप्रिलपर्यंततीन हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा व कृषीशी निगडीत सेवांना सुट देण्यात आली आहे. काही खासगी दवाखाने दिवसभर सुरू असतात तर काही खासगी दवाखाने दिवसभर सुरू नसतात. खासगी दवाखान्यांमध्ये तपासणीची वेळ सोयीनुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना ऐनवेळी उपचारापासून वंचित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही तसेच काही गोरगरीब रुग्णांकडे वेळेवर पैसे उपलब्ध नसल्यामुळे उपचारही मिळू शकत नाहीत. गरजूंना वेळेवर व मोफत उपचार मिळावे या उदात्त हेतूने भारतीय जैन संघटना जिल्हा शाखा वाशिमचे प्रकल्प संयोजक शिखरचंद बागरेचा व सहप्रकल्प संयोजक बी.जे.एस. तथा जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी पुढाकार घेऊन १९ एप्रिलपासून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या कामी अनेक डॉक्टर व समाजातील दानशूरांनी सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून मदत दिली आहे. वाशिम शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांची मोफत तपासणी व औषधी दिली जाते. यापूर्वी वाशिम शहरातील घाणमोडी, चामुंडा देवी परिसर, आनंदवाडी, वीर लहुजी नगर, निमजगा, भिमनगर, आनंदवाडी, ग्रामीण भागात कुंभारखेडा, केकतउमरा यासह अन्य भागात २८०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. २५ एप्रिल रोजी स्थानिक जनशिक्षण संस्थान परिसरात ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जवळपास २०० जणांची तपासणी व औषध वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, संयोजक शिखरचंद बागरेचा, सहसंयोजक तथा बी.जे.एस. चे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, पथक प्रमुख डॉ. सुजाता भगत, नितीन व्यवहारे, संजय भांदुर्गे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक केले. यापुढेही आरोग्य तपासणीचा उपक्रम सुरू राहणारलॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी व औषधीसंदर्भात गैरसोय होऊ नये म्हणून हा उपक्रम लॉकडाउन व संचारबंदी लागू असेपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमातील चमू कार्यरत आहे, असे भारतीय जैन संघटना जिल्हा शाखा वाशिमने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या