शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

१०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग महाराष्ट्र शासन पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्यामार्फत चार महिने कालावधीचे मोफत पूर्वप्रशिक्षण घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांना बुधवारी प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण वाशिम येथे करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग महाराष्ट्र शासन पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्यामार्फत चार महिने कालावधीचे मोफत पूर्वप्रशिक्षण घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांना बुधवारी प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण वाशिम येथे करण्यात आले.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एलआयसी आदी लिपिकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षकेच्या पूर्व तयारी करिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण वाशिम येथे गत दहा वर्षांपासून  बार्टी व प्रसंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जात आहे. चार महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच मोफत पुस्तक संच वितरण सोहळा वाशिम येथे पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलिस अधीक्षक संदीप पाटील तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, प्रसंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करीत आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी विनायक जाधव, मराठा सेवा संघाचे माधव बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते बालन तायडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. डॉ. गजपाल इंगोले यांनी या उपक्रमाची माहिती देत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करावे, असा सल्ला दिला. संचालन अमोल पाईकराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसंग संस्थेचे प्रकल्प समन्वयक संजय इंगोले, प्रसेनजित धडे, विनोद राऊत, अमोल बोरकर यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी