शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे चतुर्थ आंतराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 18:37 IST

वाशिम: येत्या २१ जून रोजी साजरा केल्या जाणाºया आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी मालेगाव योग समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबैठकीत २१ जून रोजी मालेगाव येथे आयोजित योग दिनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. २० जून रोजी सकाळी ११ वाजता भव्य दुचाकी रॅली काढून शहरामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

वाशिम: येत्या २१ जून रोजी साजरा केल्या जाणाºया आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी मालेगाव योग समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मातोश्री संकुल शेलू फाटा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रभारी गजानन धर्माळे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश सदस्य गोपाल पाटिल राऊत प्रांतीय सदस्य रामदास धनवे, सह राज्यप्रभारी शंकर नागपुरे, किसान पंचायतचे शंकर ठाकरे, बाळूभाऊ काळे, जिल्हा कोषाध्यक्ष भगवंतराव वानखडे आदिंची उपस्थिती होती. या बैठकीत २१ जून रोजी मालेगाव येथे आयोजित योग दिनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. युवा स्वालंबन आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त शहरातील ना. ना. मुंदडा विद्यालय मालेगाव येथे २१ जून रोजी सकाळी सहा ते आठ या वेळात भव्यदिव्य योग शिबिराचे आयोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यासाठी योग प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यातून प्रशिक्षित शिक्षक येणार आहेत, तसेच २० जून रोजी सकाळी ११ वाजता भव्य दुचाकी रॅली काढून शहरामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. योग दिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समिती मालेगाव व सर्व समाजातील व सर्व राजकीय पदाधिकारी व्यापारी विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी उद्योजक महिला व पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन व प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी असेही यावेळी ठरले. यामध्ये पतंजली योग समितीकडून विविध समाजोपयोगी योजना राबविण्यात येणार आहे. याची माहिती गजानन धर्माळे यांनी दिली. त्यामध्ये युवा स्वालंबन शिबीर निवासी पतंजली कॉल रोजगार निर्मिती २३ ते २७ जून वाशिम येथे होईल. पतंजली योग समितीमार्फत बीएसएनएलचे सीम कार्ड सुद्धा उपलब्ध होईल. स्वदेशी समृद्धी कार्ड योजना सुद्धा कार्यांन्वित करण्यात येईल. यावेळी शंकर नागपुरे, गोपाल पाटील राऊत यांनीही मार्गदर्शन केले.  यावेळी तालुका प्रभारी यशवंतराव जावळे, दिनेश उंटवाले, नामदेव बोरचाटे, तेजस आरु, विष्णू उगले, नितीन काळे, अनिल गवळी, सुनिल राऊत, मंगेश गवळी, उमेश आंधळे,  दिनेश नाकट यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमYogaयोग