शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; बुधवारपासून जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 11:52 IST

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोनामुळे रविवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोनामुळे रविवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला. आता मृत्युसंख्या ५४ वर पोहचली आहे. दरम्यान वाशिम शहरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय व्यापाऱ्यांनी रविवार, १३ सप्टेंबरच्या बैठकीत जाहिर केला.जुलै व आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. रविवारी आणखी चार जणांचे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाने आतापर्यंत एकूण ५४ जणांचा बळी घेतले आहेत.दरम्यान, वाशिम शहरातही रुग्णवाढीचा दर उंचावला असून, शहरातील एकूण रुग्णसंख्या ८०० च्या घरात पोहचली आहे. एकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही, शहरातील बाजारपेठेत नागरिकांची दिवसेंदिवस प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. अनेकजण मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळत नाहीत. या पृष्ठभूमीवर व्यापारी मंडळ, युवा व्यापारी मंडळाने १२ व १३ डिसेंबर रोजी वाशिम येथे बैठक घेत जनता कर्फ्यूबाबत सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती वाशिम शहरात १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान केवळ हॉस्पिटल, मेडीकल, दूध संकलन व विक्री या अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली जाणार आहे. वाशिम शहरात स्वयंस्फुर्तीने ‘जनता कर्फ्यू’ची ही पहिलीच वेळ आली. जनता कर्फ्यूला शहरवासियांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, सचिव मनिष मंत्री, व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, सचिव भरत चंदनानी यांनी केले.चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यूजिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद १३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. जिल्हा कोविड रुग्णालयात ९ सप्टेंबर रोजी दाखल वाशिम शहरातील ६४ वर्षीय पुरुष व ८ सप्टेंबर रोजी दाखल मंगरूळपीर शहरातील ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ९ सप्टेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व १० सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पिंप्री अवगण येथील ५५ वर्षीय महिला व मानोरा येथील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत एकूण ५४ जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या