वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चार जणांचा मृत्यू, तर ५०३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४,९७९ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार आणखी चार जणांचा मृत्यू झाला, तर ५०३ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील ९२, अंजनखेडा १, अनसिंग १३, बाभूळगाव १, ब्रह्मा १, धुमका १, गोंडेगाव २, हिवरा रोहिला १, जांभरुण १, जांभरुण नावजी येथील १, केकतउमरा येथील ४, कोकलगाव येथील १, कोंडाळा येथील १, मोहगव्हाण १, मोहजा येथील १, मोतसावंगा येथील १, नागठाणा येथील १७, पंचाळा येथील १६, पांडव उमरा २, पिंपळगाव १, सावंगा १, सावरगाव बर्डे ४, सावरगाव जिरे येथील १, सायखेडा येथील १, सोनखास येथील १, सुराळा येथील १, तामसी येथील ५, तांदळी शेवई १, तोंडगाव १२, उकळीपेन १, इलखी १, कळंबा महाली १, मालेगाव शहरातील २०, अमानी येथील २, चांडस येथील १, चिवरा १, डव्हा येथील ४, डोंगरकिन्ही येथील २, एकांबा येथील १, गौरखेडा येथील १, इराळा येथील १, जऊळका येथील १, जोडगाव येथील १, खंडाळा येथील १, खिर्डा येथील १, कोल्ही येथील १, मुंगळा येथील १, मुठ्ठा येथील २, नागरतास येथील १, पांगरी नवघरे १, पिंपळा १, रामनगर १, शिरपूर ५, सुकांडा १, वाडी १, किन्हीराजा २, कवरदरी येथील १, जऊळका समृद्धी कॅम्प येथील १, आमखेडा येथील १, रिसोड शहरातील ५१, बेलखेडा ९, चिखली २, चिचांबाभर ६, देगाव येथील १, देऊळगाव बंडा येथील १, गोवर्धन येथील १, घोन्सर येथील ८, घोटा येथील १, हराळ येथील २, करडा येथील ३, कवठा येथील १, केनवड येथील १, किनखेडा येथील १, कोकलगाव येथील ३, कोयाळी येथील ७, लिंगा येथील १, मांगुळ झनक येथील ५, मसला पेन येथील १, मिजार्पूर येथील २, मोप येथील १, मोरगव्हाण येथील १, मोठेगाव येथील १, रिठद येथील २, सवड येथील ४, वाडी रायताळ येथील १, व्याड येथील २, वाकद येथील २, येवती येथील २, येवता येथील ३, नंधाना येथील १, धोडप बोडखे येथील १, जयपूर येथील ३, बिबखेडा येथील १, भरजहांगीर येथील १, जवळा येथील २, कौलखेडा येथील १, नेतान्सा येथील १, मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील २, बंजारा कॉलनी येथील १, धनगरपुरा येथील १, हुडको कॉलनी येथील १, माठ मोहल्ला १, पोलीस स्टेशन परिसरातील ३, संभाजीनगर येथील १, सुभाष चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, चांभई येथील १, चोंडी येथील १, दाभाडी येथील १, गिंभा येथील १, गोगरी येथील १, कासोळा येथील ३, लाठी १, मानोली २, नवीन सोनखास १, सावरगाव १, शहापूर १, भूर समृद्धी कॅम्प येथील ४, दाभा येथील १, शेलूबाजार येथील ९, कारंजा शहरातील १५, काजळेश्वर येथील २, कामरगाव येथील ३, पोहा येथील १, रहित येथील १, शहा येथील २, वढवी येथील १, झोडगा येथील १, मनभा येथील १, कुऱ्हाड येथील १, मानोरा शहरातील संभाजीनगर येथील १, राठी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील १, धानोरा येथील २, गिर्डा येथील १, हळदा येथील १, करपा येथील १, खंबाळा येथील १, कोलार येथील १, पाळोदी येथील १, पारवा येथील १, रुई येथील १, साखरडोह कॅम्प येथील ८, सोमठाणा येथील ५, सिंगडोह येथील १, वार्डा येथील २, कारखेडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १८ बाधिताची नोंद झाली असून ३७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
००
कोरोनाबाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह २४,९७९
ॲक्टिव्ह ४,३३२
डिस्चार्ज २०,३८८
मृत्यू २५८