शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १२२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 13:01 IST

आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या १२२ झाली आहे.

वाशिम : शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या १२२ झाली आहे. यापैकी ३६ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मे महिन्याच्या अखेरपासून परजिल्हा, परराज्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात दाखल झाले. बाहेरगावावरून जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांमुळे जून महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होती. १ जुलै रोजी कोरोनाबाधित रुग्णसंख्येने शतक ओलांडले. जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अधिक अलर्ट झाली. शनिवार, ४ जुलै रोजी  रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 'आयएलआय'ची लक्षणे असलेले मालेगाव येथील २६ व ३४ वर्षीय पुरुष, नागपूर येथे कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील मंगरुळपीर येथील २९ वर्षीय पुरुष आणि औरंगाबाद येथून हराळ (ता. रिसोड) येथे परतलेल्या २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १२२ झाली असून, यामध्ये ३६ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यात जिल्ह्यातील १०९, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाºया १३ जणांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात २९ तर जिल्ह्याबाहेर सात अशा एकूण ३६ जणांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनामूक्त होणाºया रूग्णांचे प्रमाणही वाढतच असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने वाशिम, मंगरूळपीर, रिसोड व कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी व शरीरातील आॅक्सिजन पातळी तपासणी मोहिम २१ जूनपासून सुरू केलेली आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करण्यात येत आहे. ४ जुलैपर्यंत जवळपास ७० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या