शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनसिंग येथील हत्याकांडप्रकरणी चौघांना जन्मठेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 14:59 IST

२१ मार्च २०१४ रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे घडलेल्या या घटनेचा निकाल शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यात विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. जटाळे यांनी सुधाकर नवघरे याच्यासह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माहेरच्या लोकांना मारझोड करून बायकोला जबरदस्तीने सोबत घेवून जाण्याच्या प्रयत्नात सैन्यदलात कार्यरत सुधाकर नवघरे याने स्वत:च्या सासूची कुकरी नावाच्या शस्त्राने हत्या केली. २१ मार्च २०१४ रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे घडलेल्या या घटनेचा निकाल शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यात विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. जटाळे यांनी सुधाकर नवघरे याच्यासह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनसिंग येथील काजोल लक्ष्मण कालापाड हिचे लग्न १८ डिसेंबर २०१२ रोजी सैन्यदलात कार्यरत सुधाकर विश्वास नवघरे याच्यासोबत झाले. लग्नाच्या वेळी काजोल ही दहाव्या वर्गाला शिक्षण घेत होती. त्यासाठी ती माहेरीच वास्तव्याला असायची. यादरम्यान मार्च २०१४ या महिन्यात काकाच्या मुलाच्या लग्नानिमित्त सुधाकर हा सुटी घेवून घरी आला असता, त्याने आपले आई-वडिल व भावाला सोबत घेवून बायकोचे माहेर गाठले व काजोलला सोबत पाठविण्याचा तगादा लावला. मात्र, यावेळी तीची दहावीची परीक्षा सुरू असल्याने आई-वडिलांनी पाठविण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी भांडण केले. २० मार्च २०१४ रोजी याच कारणावरून काजोलचा भाऊ सतीश कालापाड यास मारझोड करण्यात आली.दरम्यान, २१ मार्च २०१४ रोजी पुन्हा एकवेळ आरोपींनी काजोलच्या घरी येवून तीचे वडिल लक्ष्मण कालापाड, आई नंदाबाई कालपाड यांना शिविगाळ केली. तसेच आरोपी सुधाकर नवघरे याने त्याच्या बॅगमधून कुकरी नावाचे शस्त्र काढून काजोल, लक्ष्मण व नंदाबाई यांच्यावर वार केले. त्यात नंदाबाई कालापाड ह्या जागेवरच मरण पावल्या; तर काजोल व तिच्या वडिलांचे प्राण सुदैवाने बचावले.सदर घटनेची फिर्याद काजोल लक्ष्मण कालापाड हिने अनसिंग पोलिस स्टेशनला दाखल केल्यावरून पोलिसांनी सुधाकर नवघरे, विश्वास नवघरे, प्रदिप नवघरे आणि लिलाबाई नवघरे अशा चार आरोपींविरूद्ध कलम ३०७, ३०२, ५०४, ५०६, १०९ अन्वये गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सरकारच्या वतीने याप्रकरणी १० साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष आणि पुरवे ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. जटाळे यांनी नमूद चारही आरोपींना दोषी ग्राह्य धरून जन्मठेप सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनोद फाटे यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपCourtन्यायालय