शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ऐन परीक्षेच्या तोंडावर विजेचे ‘फोर्स लोडशेडींग’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:59 IST

वाशिम : २१ फेब्रूवारीपासून सर्वत्र बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षेस सुरूवात होत आहे. असे असताना महावितरणकडून विद्यूत उपकेंद्र अतीभारित होण्याचे कारण समोर करून ग्रामीण भागात ८ ते १० तासांचे ‘फोर्स लोडशेडींग’ करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

वाशिम : २१ फेब्रूवारीपासून सर्वत्र बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षेस सुरूवात होत आहे. असे असताना महावितरणकडून विद्यूत उपकेंद्र अतीभारित होण्याचे कारण समोर करून ग्रामीण भागात ८ ते १० तासांचे ‘फोर्स लोडशेडींग’ करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे मात्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होत असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहे.महावितरणकडून राज्यात कुठेही सद्या विद्यूत भारनियमन केले जात नसले तरी विजेच्या अन्य स्वरूपातील समस्या देखील कमी झालेल्या नाहीत. लोकसंख्येच्या तुलनेत कमी क्षमता असलेली विद्यूत उपकेंद्र, गावठाण फिडरवर क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेल्या जोडण्या, जीर्ण झालेल्या विद्यूत वाहिन्या आदी कारणांमुळे बहुतांश विद्यूत उपकेंद्रांवर अधिकचा ताण ओढवून तांत्रिक बिघाड उद्भवणे, रोहित्र जळून नादुरूस्त होणे आणि त्यामुळे विद्यूत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिक अक्षरश: त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळातही हा प्रकार थांबला नसल्याने महावितरणप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे. सद्या हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाल्याने विजेची मागणी देखील वाढली आहे. यामुळे विद्यूत उपकेंद्रांवर अधिकचा ताण ओढवत असल्याने काही ठिकाणी ‘फोर्स लोडशेडींग’ करावे लागत आहे. असे असले तरी परीक्षा काळात यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.- आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण