त्रिसूत्रीचे पालन करा आणि संसर्गाची साखळी तोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:53+5:302021-04-14T04:37:53+5:30

सध्या सर्वत्रच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता आता तरी नागरिकांनी स्वत:ही संसर्गाची साखळी ...

Follow the Trisutri and break the chain of infection! | त्रिसूत्रीचे पालन करा आणि संसर्गाची साखळी तोडा!

त्रिसूत्रीचे पालन करा आणि संसर्गाची साखळी तोडा!

Next

सध्या सर्वत्रच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता आता तरी नागरिकांनी स्वत:ही संसर्गाची साखळी तोडण्यास पुढाकार घेतला पाहिजे. आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ, हे वैद्यकशास्त्राचे महत्त्वाचे तत्त्व आहे. साथीच्या आजाराच्या प्रतिबंधाच्या तीन पायऱ्या असतात. पहिल्या पायरीत आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती, आजारापासून संरक्षण, सर्वांकडून लक्षता आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. एखाद्या आजाराची साथ थोपविण्यासाठी त्यात संपूर्ण समाजाचा सहभाग असेल, तर त्याची परिणामकारता वाढू शकेल. सर्वांच्या एकत्रितपणाने साथीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी काम केल्यास तो प्रभावीपणे आटोक्यात येण्यास निश्चितच मदत होईल. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कोरोनाबाधित व संदिग्धांनीदेखील योग्य ती खबरदारी घेतली पाहिजेत. कोरोनाने बाधित रुग्ण खोकल्यावर त्याच्या खोकल्यातून द्रव स्वरूपातले तुषार हवेत पसरतात. त्या तुषारांमध्ये हे अतिसूक्ष्म विषाणू लाखोंच्या संख्येत असतात. अशा वेळेस त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींच्या श्वासातून ते विषाणू त्यांच्या श्वसनमार्गात जातात आणि ते बाधित होतात. दुसरा प्रकार म्हणजे खोकल्यातले तुषार आणि त्यातले विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. म्हणजे टेबल, खुर्ची, दरवाजा, बसच्या सीटस इत्यादी. या वस्तूंवर हे विषाणू बराच काळ जिवंत राहतात. मग अशा वस्तूंना कुणी निरोगी व्यक्तीने हस्तस्पर्श केला आणि त्याचे ते हात नंतर स्वत:च्या चेहऱ्याला, नाकाला, तोंडाला लावले, तर त्या निरोगी व्यक्तीला या विषाणूंचा संसर्ग होतो. संसर्गाचे मार्ग लक्षात घेता आता तरी समाजात शारीरिक अंतर राखण्याची जबाबदारी यंत्रणानी अमलात आणण्यासह नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. मास्कचा नियमित वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणेही त्रिसूत्री पाळणे सक्तीचे आहे.

- डॉ. सचिन पवार, हृदयरोगतज्ज्ञ,

कोविड हॉस्पिटल, वाशिम.

जाणून घ्या, किती जणांना आपल्याकडून होऊ शकतो संसर्ग

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वीच दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. अशा बहुतेक वाहकांमध्ये कोणती लक्षणे दिसतही नाहीत. खोकताना किंवा शिकताना आपले तोंड झाकून घेतले, तर संसर्गाचे प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकते.

हा विषाणू, ज्याला संसर्ग झाला आहे तिच्यातील संसर्ग काळातील लाळ, थुंकी, विष्ठेत असतो. - संसर्ग झालेल्या एकाकडून इतरांना संसर्ग होण्याची सरासरी संख्या म्हणजे मानवी संक्रमण पल्ला २.२ ते ३.१ यादरम्यान आहे, म्हणजे संसर्ग झालेली एक व्यक्ती साधारणपणे २.२ ते ३.१ व्यक्तींना संसर्ग पोहोचवू शकते.

प्रत्यक्षात लोकांमध्ये अंतर राखून आपण संक्रमणात कपात करून संसर्गाचे प्रमाण कमी करू शकतो.

Web Title: Follow the Trisutri and break the chain of infection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.