शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात चाराटंचाई; पशुपालक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:17 IST

रिसोड : गतवर्षी पडलेल्या अपुºया पावसामुळे रिसोड तालुक्यातील पशुपालकांना यावर्षी चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चाºयाच्या बाजारभावातही वाढ झाल्याने पशुपालकांच्या खिशाला झळ बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : गतवर्षी पडलेल्या अपुºया पावसामुळे रिसोड तालुक्यातील पशुपालकांना यावर्षी चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चाºयाच्या बाजारभावातही वाढ झाल्याने पशुपालकांच्या खिशाला झळ बसत आहे.गतवर्षी रिसोड तालुक्यात पावसाने सरासरी गाठली नाही. एकूण सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. तालुक्यातील प्रकल्पातही सध्या सरासरी पाच टक्के जलसाठा आहे. त्यापैकी १० प्रकल्प तर कोरडेठण्ण आहेत. गतवर्षीच्या खरिप हंगामात शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. प्रकल्पांत पाणी नसल्याने आणि भूजलपातळीत घट झाल्याने जनावरांसाठी हिरवा चाराही शेतकºयांना घेत आला नाही. जिल्ह्यात केवळ रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला आहे, यावरून तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती लक्षात येते. मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याने तालुक्यात चारा छावणी सुरू होणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप चारा छावणी सुरू झालेली नाही. चारा टंचाई असल्याने चाºयाच्या बाजारभावात कमालीची वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ ते २० टक्क्याने सुका व ओल्या चाºयाच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका पशुपालकांना बसत आहे. चाराटंचाईच्या पृष्ठभूमीवर चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.जिल्ह्यातील चाºयाची परजिल्ह्यात वाहतूक .. जिल्ह्यात चाराटंचाई असल्याने जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर निर्बंध आहेत. तथापि, याकडे दुर्लक्ष करीत जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात असल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यातील काही ठिकाणांवरून परजिल्ह्यात चाºयाची विक्री होत असल्याचे दिसून येते. परजिल्ह्यातील पशुपालक जादा दर देत असल्याने ही चाराविक्री होत असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील जनावरांचा चारा परजिल्ह्यात जाऊ नये याकरीता प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे.

पाणीटंचाईची तिव्रता वाढली..रिसोड तालुक्यात सध्या तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुपालकांच्या समस्येत भर पडली आहे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करताना पशुपालकांच्या नाकीनऊ येत आहे. काही गावांमध्ये माणसांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी कोसोदूर पायपिट करावी लागत असल्याने तेथे जनावरांसाठी पाणी उपलब्ध करताना पशुपालकांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती