शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार; रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापरही घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:53 IST

Remedesivir injection News जिल्ह्यात रेमेडीसिवर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देप्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. दिवसाकाठी सरासरी १५ ते २० रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापर होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार असून, पूर्वीच्या तुलनेत सध्या रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापर प्रचंड प्रमाणात घटला आहे. जवळपास ८० टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात असून, जिल्ह्यात रेमेडीसिवर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली आला. नोव्हेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट आली. डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाची साैम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. सध्या जवळपास १५ ते २० रुग्ण हे सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत, तर उर्वरित रुग्णांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. दिवसाकाठी सरासरी १५ ते २० रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापर होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रेमेडीसिवर इंजेक्शन उपलब्ध आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. साैम्य लक्षणे असणारे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये जवळपास १५ ते २० रुग्ण उपचारार्थ आहेत. रेमडेसिवर इंजेक्शनसह आवश्यक त्या औषधीचा साठा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.- डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या