शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीत फुलांचे भाव तिप्पट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 18:12 IST

रिसोड शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या फुलांचे भाव तिप्पट ते चौपट वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड  (वाशिम) : ऐन सणासुदीच्या काळात रिसोड शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या फुलांचे भाव तिप्पट ते चौपट वाढले आहेत. यामुळे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.शुक्रवारी बाजारात फुलाचे भाव वाढल्यामुळे गौरी पूजेला लागणाºया हाराची किंमत दुप्पट, तिप्पट झाली होती. सध्या बाजारात फुलांचा तुटवडा असून ज्या फुलांचे भाव मागील वर्षी १०० रुपये किलो होते, ती फुले यावर्षी ३०० रुपये किलो विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे फुलांचे भाव वाढल्याचे फुल विक्रेते मनोहर जहीरव यांनी सांगितले. गौरी गणपती सण एकाच वेळी आल्याने शुक्रवार रिसोड येथील बाजारात फुलाचा तुटवडा जाणवला. शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविकांनी फुल तसेच फुलांचे हार खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली होती. शनिवारीदेखील फुल खरेदीसाठी भाविकांची गर्दी दिसून आली. अनेकांनी झेंडूचे फुले घेऊन घरीच हार तयार करण्यात पसंती दिली. मागील वर्षी हाराच्या किंमती दीडशे रुपये जोडी अशा होत्या. यावर्षी तीनशे रुपये जोडी किंमतीने हार विक्री झाली. गतवर्षी ३०० रुपये हाराची किंमत असलेला हार यावर्षी ७५१ रुपयाला विक्री करण्यात आले. मागील वर्षी झेंडूचे भाव ३० ते ४० रुपये किला असे होते. यावर्षी तेच भाव शंभर रुपये किलो होते. शेवंती शंभर रुपयावरून यावर्षी ३०० रुपये किलो, निशिगंधा २०० रुपयावरून ४०० रुपये अशा फुलांच्या किंमती वाढल्या. फुुल विक्रेते जहिरव म्हणाले की, हैद्राबाद, अहमदनगर, नांदेड येथून फुले आणावी  लागतात. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या दरानुसार ग्राहकांना फुलांची विक्री करावी लागते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMarketबाजार