शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांच्या आधार, खाते क्रमांकात दुरुस्ती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:41 IST

वाशिम : राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (एनएसएपी) अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थींचे आधार, खाते क्रमांकांची दुरुस्ती निराधार योजना विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकेंद्र पुरुस्कृत योजनांच्या लाभार्थींचे अनुदान थेट शासनाकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपासून अंमलात आली आहे. यासाठी सर्वच लाभार्थींचे आधार क्रमांक आणि खाते क्रमांकासह इतर संपूर्ण माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. १३ हजार ५८६ लाभाथीर्चे खाते क्रमांक आणि आधार क्रमांक जुळत नसल्याचे पडताळणीत दिसून आले आहे.

वाशिम : राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (एनएसएपी) अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थींचे आधार, खाते क्रमांकांची दुरुस्ती निराधार योजना विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.केंद्र पुरुस्कृत योजनांच्या लाभार्थींचे अनुदान थेट शासनाकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपासून अंमलात आली आहे. यासाठी सर्वच लाभार्थींचे आधार क्रमांक आणि खाते क्रमांकासह इतर संपूर्ण माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यातून एनएसएपी पोर्टलवर टाकण्यात आलेल्या १३ हजार ५८६ लाभाथीर्चे खाते क्रमांक आणि आधार क्रमांक जुळत नसल्याचे पडताळणीत दिसून आले आहे. त्यामुळे या लाभार्थींची एनएसपी पोर्टलवर नोंद होऊ शकलेली नाही. वाशिम जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाप पकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे मिळून १९१९७ लाभार्थी आहेत. सर्व लाभार्थींकडून त्यांचे आधार क्रमांक, वयाचा दाखला, अंपंगत्वाचे आॅनलाइन प्रमाण पत्र, तसेच तलाठ्याच्या दाखल्यासह इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती घेण्यात आली आणि एकूण १५४७७ लाभार्थ्यांची माहिती एनएसएपी पोर्टलवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने टाकण्यात आली. त्यापैकी केवळ १८९१ लाभार्थ्यांची माहिती जुळत असल्याने तेवढ्याच लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर झाली असून, उर्वरित १३ हजार ५८६ लाभाथीर्चे प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे फेटाळण्यात आलेल्या १३५८६ लाभार्थ्यांसह इतर ३७२० लाभार्थी मिळून एकूण १७३०६ लाभार्थींची अचूक माहिती पुन्हा प्रशासनाला संकलित करून ती एनएसएपी पोर्टलवर टाकण्यासाठी निराधारांचे आधार क्रमांक आणि खाते क्रमांक टाकण्याबाबत झालेल्या चुकांची दुरुस्ती करून ही माहिती नव्याने तयार करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना