शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण नियमानुकूलचे पाच हजार प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:01 IST

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील २२ हजार प्रस्तावांपैकी १७ हजार प्रस्ताव निकाली निघाले असून, अद्याप पाच हजार प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.

- संतोष वानखडेवाशिम : निवासी प्रयोजनार्थ इ-क्लास, गावठाण जमिनीवर केलेले अतिक्रमण घरकुल लाभार्थींना नियमानुकूल करून देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले जातात. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील २२ हजार प्रस्तावांपैकी १७ हजार प्रस्ताव निकाली निघाले असून, अद्याप पाच हजार प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.निवासी प्रयोजनार्थ गावठाण, गायरान जमिनीवर करण्यात आलेले २०११ पर्यंतचे अतिक्रमण कायम किंवा नियमित करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. सर्वांसाठी घरे २०२२ या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामसभेत ठराव पारित झाल्यानंतर सदर प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे मंजूरीसाठी पाठविला जातो. अमरावती विभागात गावठाण व इ क्लास जमिन असे एकूण २२ हजार ३८९ प्रस्ताव आहेत. यापैकी १७ हजार ४०० प्रस्ताव निकाली निघाले आहेत. उर्वरीत पाच हजार प्रस्ताव त्या, त्या उपविभागीय अधिकाºयांकडे प्रलंबित आहेत. अमरावती जिल्ह्यात ७१३३ पैकी ४६८७ प्रस्ताव निकाली निघाले आहेत. अकोला जिल्ह्यात ३१८८ पैकी सर्वच प्रस्ताव निकाली निघाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ५८७३ पैकी ४८१०, बुलडाणा जिल्ह्यात ३५६९ पैकी २८१५, वाशिम जिल्ह्यात २६२६ पैकी १९०० असे प्रस्ताव निकाली निघाले असून, उर्वरीत पाच हजार प्रस्ताव प्रलंबित आहेत. अतिक्रमण नियमानुकूलसंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही काही ग्राम पंचायती संबंधित लाभार्थींना यासंदर्भात माहिती देत नसल्याची बाब वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सोनाली विनोद जोगदंड यांनी आठ दिवसांपूर्वी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली होती. याची दखल घेत संबंधित लाभार्थींला तातडीने अतिक्रमन नियमानुकूल झाल्याचे पत्र देण्यात आले. अमरावती विभागातील उपविभागीय अधिकाºयांकडे प्रलंबित असलेली पाच हजार प्रकरणेही तातडीने निकाली काढावी, अशी मागणी जोगदंड यांनी महसूल विभागाकडे मंगळवारी केली.

टॅग्स :washimवाशिम