शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी पाच कोरोना ‘पॉझिटीव्ह’: रुग्णसंख्या २६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:04 IST

पाच जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा आरोग्य विभागास गुरुवारी ३३ जणांचे कोरोनाविषयक अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीसह, दिल्ली येथून सुकळी (ता. कारंजा लाड) येथे आलेल्या व 'आयएलआय' लक्षणे असलेल्या एकाच कुटुंबातील ३२ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला व २ वर्षीय बलिकेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. कारंजा लाड येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २६ झाली असून, त्यात १८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.गुरुवार ११ जून रोजी जिल्हा आरोग्य विभागास ३३ अहवाल प्राप्त झाले. त्यात कारंजा तालुक्यातील बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाविषयक अहवाल आज 'पॉझिटिव्ह' आला आहे. सदर व्यक्ती बोराळा हिस्से येथील कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आला होता. त्याशिवाय दिल्ली येथून सुकळी (ता. कारंजा लाड) येथे आलेल्या व 'आयएलआय' लक्षणे असलेल्या एकाच कुटुंबातील ३२ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला व २ वर्षीय बलिकेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे, तर कारंजा लाड येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर व्यक्तीला कोरोना संसर्गांची लक्षणे असल्याने खासगी रुग्णालयाने 'रेफर' केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६ झाली असून, त्यात १८ जण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात ४८ जणबुधवारी ज्या सहा जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आले. त्या सहा रुग्णांच्या ‘हायरिस्क’ संपर्कातील ४८ जणांचे अहवाल तपासणीस पाठविण्यात आले, तर गुरुवारी पॉझिटीव्ह आढळलेल्या पाच रुग्णांच्या ‘हायरिस्क’ संपर्कातील नागरिकांच्या माहितीचे संकलन आरोग्य विभागाने सुरू केले आहे. जिल्हा आरोग्य विभागास बुधवारी सहा जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले. यापैकी चार जण हे बोराळा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील असून, यामध्ये निमजगा येथील तीन, वाशिम येथील एकाचा समावेश इसमाचा समावेश आहे. तसेच शेलुबाजार,शेमलाई येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे निमजगा आणि शेमलाई ही गावे सील करण्यात आली, तर शेलुबाजारचा एक प्रभाग सील करून या तिन्ही ठिकाणच्या १४ हजार नागरिकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे, तर गुरुवारी कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या पाच जणांच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाले सुरू केली असून, कारंजातील सुकळी ेगाव सील करून तेथे आरोग्य पथक दाखल करण्यात आले आहे. हे आरोग्य पथक पुढील १४ दिवस गावातील नागरिकांची तपासणी करणार आहे.

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या