शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५१० अस्थायी तलाठ्यांना पाच महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 16:25 IST

आॅगस्ट २०२० पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देण्यात आली.

वाशिम : अमरावती विभागात तलाठ्यांची एकूण २३२६ पदे मंजूर असून, १८०६ पदे स्थायी स्वरुपात भरण्यात आली आहेत. उर्वरीत ५२० पदे अस्थायी असून, त्यांची मुदत मार्च २०२० मध्ये संपली. या तलाठ्यांना एप्रिल महिन्यापासून पूर्ववत केले असून, आॅगस्ट २०२० पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देण्यात आली.महसूल विभागाचा कणा म्हणून तलाठ्यांची ओळख आहे. गावपातळीवर महसूलविषयक कामांची जबाबदारी तलाठ्यांवर सोपविली जाते. तलाठी संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्याने या पदांचा प्रभार कार्यरत तलाठ्यांकडे सोपविला जातो तर काही ठिकाणी अस्थायी स्वरुपात तलाठ्यांची पदे भरली जातात. अमरावती विभागात तलाठ्यांची एकूण मंजूर पदे २३२६ अशी आहेत. यापैकी ५२० पदे रिक्त असनू, सदर पदे ही अस्थायी स्वरुपात भरण्यात आली आहे. या ५२० तलाठ्यांची मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपली असून, एप्रिल २०२० या महिन्यापासून या तलाठ्यांना पुढील पाच महिन्यांसाठी अर्थात आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १३१, अकोला जिल्ह्यातील ७१, यवतमाळ जिल्ह्यातील १४३, वाशिम जिल्ह्यातील ६०, बुलडाणा जिल्ह्यातील ११५ तलाठ्यांचा समावेश आहे.  वाशिम जिल्ह्यात २८८ पदे मंजूर असून, २२८ पदे भरण्यात आली तर उर्वरीत ६० तलाठी अस्थायी आहेत. महसूल विभागाने अस्थायी स्वरुपातील तलाठ्यांना आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ दिली असून, शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग