शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांना पाच ‘केआरए’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:05 IST

वाशिम : राज्यातील महानगर पालिकांसह नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आयुक्त व मुख्याधिकाºयांना राज्याच्या नगर विकास विभागाने पाच प्रकारचे ‘केआरए’ (विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र) दिले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील महानगर पालिकांसह नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आयुक्त व मुख्याधिकाºयांना राज्याच्या नगर विकास विभागाने पाच प्रकारचे ‘केआरए’ (विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र) दिले आहेत. स्वच्छता अभियानावर यात विशेष भर देण्यात आला आहे.यासंदर्भात ८ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे, की वाढते नागरीकरण ही संधी माणून केंद्र व राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची कालबद्ध व कालमर्यादेत अंमलबजावणी करण्यासाठी महानगर पालिकांचे आयुक्त व नगर परिषद, नगर पंचायतीच्या मुख्याधिकाºयांनी कार्य करायचे आहे. त्यानुसार, ३१ मार्च २०१९ पर्यंत नागरी स्वच्छतेत अग्रक्रम मिळविण्यासाठी संपूर्ण शहर हगणदरीमुक्त राखण्यात सातत्य राखणे, घनकचरा विलगीकरण मोहिम राबविणे, ओल्या कचºयाचे कंपोस्टींग करणे. यासह स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहरास मिळालेल्या गुणानुक्रमापेक्षा स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये अधिक प्रगत गुणानुक्रम मिळविणे, विविध प्रकारच्या करांची ९० टक्क्यांपेक्षा अधिक वसूली करणे, स्वउत्पन्नवाढीसाठी विशेष उपाययोजना करणे, पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्राधान्यक्रमाने पुर्णत्वास नेणे, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी व अन्य प्रशासकीय बाबींची वेळेत पुर्तता करणे, असे पाच प्रकारचे केआरए शासनाने आयुक्त व मुख्याधिकाºयांना दिले आहेत. यामुळे महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींच्या कामकाजात निश्चितपणे गती प्राप्त होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नगर विकास विभागाकडून देण्यात आलेल्या ‘केआरए’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. शहर विकासाच्या दृष्टीकोणातून हे ‘केआरए’ अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहेत.- वसंत इंगोलेमुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका