शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात शेलुबाजार-मंगरुळपीर रस्ता जाम; बस फसल्याने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:29 IST

शेलुबाजार येथे अडाण नदीवर पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर एसटी बस फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

लोकमत न्युज नेटवर्क शेलूबाजार (वाशिम) : अकोला-मंगरुळपीर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. शनिवारी आलेल्या पावसामुळे या मार्गावर शेलुबाजार येथे अडाण नदीवर पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर एसटी बस फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. संबंधित कंत्राटदाराने पावसाळा लक्षात घेऊन पर्यायी रस्ता मजबूत न केल्याने या ठिकाणी चिखल तयार झाला. यामुळेच हा प्रकार घडला. पुढे ही समस्या येऊ नये म्हणून कंत्राटदाराने त्वरीत पर्यायी रस्ता मजबूत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेलुबाजार येथील अडाण नदीवरील पूर्वीचा पूल तोडून नवा पूल करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून पुलाच्या बाजुलाचा तात्पुरता पर्यायी रस्ता करण्यात आला. तथापि, या रस्त्याला खडीकरण करून मजबूत करण्यात आले नाही आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपही टाकण्यात आले नाही. अशातच २२ जून दुपारी शेलूबाजार परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे खोलगट भागात असलेल्या या मार्गावर पहिल्याच पावसात पाणी साचून चिखल तयार झाला आणि या रस्त्यावरुन वाहने घसरू लागली आणि फसूही लागली. त्यात बंद पडलेली एक बस मंगरुळपीर येथून दुसºया एसटी बसच्या आधाराने या मार्गावरून नेण्यात येत असताना चिखलात फसल्या. त्यामुळे नदीच्या पुलापासून ते शेलुबाजार चौकापर्यंत वाहनांची रांगच लागली होती. अखेर जेसीबीला बांधून चिखलात फसलेल्या दोन्ही बस बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मार्गाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरु असतानाही वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याला तयार नाही.

मागील सहा महिन्यांपासून या मार्गावरुन मार्गक्रमण करणाºया वाहनाधारकांना धुळीचा सामना करावा लागला आणि आता याच वाहनाधारकांना कंत्राटदार व संबधीत अधिकाºयांच्या हलगर्जीमुळे वाहतूक खोळंब्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढे यामुळे गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन प्रशासनाला दखल घेण्याच्या सुचना करण्याची मागणी जनतेच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर