शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पहिल्याच दिवशी १४०० प्रवाशांनी केला लालपरीतून प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 11:20 IST

. जिल्हयात असलेल्या ४ आगाराच्या २५ बसेसव्दारे ७८ फेऱ्या करण्यात आल्यात. याव्दारे ४७ हजार ४९४ रुपयांचे उत्पन्न आगाराला झाले.

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या २३ मार्चपासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला गुरुवार २० आॅगस्टपासून सुरुवात करण्यात आली. यात पहिल्याच दिवशी १४०७ प्रवाशांनी प्रवास केला. जिल्हयात असलेल्या ४ आगाराच्या २५ बसेसव्दारे ७८ फेऱ्या करण्यात आल्यात. याव्दारे ४७ हजार ४९४ रुपयांचे उत्पन्न आगाराला झाले.वाशिम जिल्हयात वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर असे चार आगार आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमिवर २३ मार्चपासून एसटी बस बंद करण्यात आली होती. यामुळे एसटी महामंडळाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. एसटी महामंडळाने २० आॅगस्टपासून एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले. त्यानुसार शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून वाशिम जिल्हयात एसटी बस धावली. अनेक महिन्यापासून बंद असलेली बस सुरु झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला . तर अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा या लगतच्या जिल्ह्यातील एक दोन बसफेºया वगळता परजिल्ह्यातील फेºया वाशिम जिल्ह्यात आल्या नसल्या तरी जिल्हयात चारही आगाराच्या बसेसने ७८ फेºया केल्यात. यामध्ये वाशिम आगारातून ७ बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बसेसनी १८ फेºयाव्दारे ११७७ कि.मी. प्रवास केला. यामध्ये ३५० प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये आगाराला १२३६० रुपये उत्पन्न मिळाले. रिसोड आगारातून ६ बसेसव्दारे २० फेºया, ९९० कि.मी. प्रवाव २११ प्रवाशांनी केले. आगाराचे कलेक्शन ८२५० रुपये ऐवढे झाले. कांरजा आगारातून ५ बसेसव्दारे २२ फेºया करुन ११०० कि.मी. प्रवास ४६० प्रवाशांनी केले. यामधून आगाराला १७८०० रुपये मिळालेत. तसेच मंगरुळपीर आगारातून ७ बसेस सोडण्यात आल्या होत्या. ७ बसेसव्दारे १८ फेºया , ९४६ कि.मी. प्रवास ३८६ प्रवाशांनी केला. यामधून आगाराला ९०८४ रुपये उत्पन्न झाले. पहिल्याच दिवशी बसला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे जिल्हयातील चारही आगारप्रमुखांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी