शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रिसोडमध्ये मंडपच्या गोदामाला भीषण आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 17:36 IST

रिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली.यासंदर्भात लग्न मंडप व्यावसायिक अशोक बशिरे यांनी रिसोड पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की रिसोड शहरातील रविदास नगरस्थित त्यांच्या गोदामाला रात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच बशिरे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पाण्याव्दारे आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत लग्न मंडपाचे साहित्य जळून खाक झाले होते. उपस्थितांपैकी काही लोकांनी यावेळी नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाशी संपर्क साधला; परंतु सदर यंत्रणा तब्बल एक तास उशिराने घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत अशोक बशिरे यांचे १८ लाख ३० हजार ५०० रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत पुढील तपास हाती घेतला आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडfireआग