शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे अखेर रेल्वे पोलीस रुजू, खासदार भावना गवळींच्या पाठपुराव्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 12:52 IST

रेल्वे स्थानकावर प्रवाशांना येणा-या अडचणींबाबत रेल्वे पोलीस चौकीची मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांनी नागरिकांच्या निवेदनानुसार दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्र पाठवून संबंधित समस्येवर विचार करण्याची सूचना केली.

वाशिम: येथील रेल्वे स्थानकावर  प्रवाशांना येणा-या अडचणींबाबत रेल्वे पोलीस चौकीची मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांनी नागरिकांच्या निवेदनानुसार दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्र पाठवून संबंधित समस्येवर विचार करण्याची सूचना केली. त्यावर तातडीने कार्यवाही करून रेल्वेच्या वतीने गुरुवारी रेल्वे पोलीस येथे रुजू केले. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.वाशिम रेल्वेस्थानकावर पाकिटमारी, साहित्य चोरीच्या घटनांत वाढ झाली होती, तसेच रेल्वेमार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच यासंदर्भात तक्रार करण्यासाठी अकोला येथे जावे लागत होते. या पृष्ठभूमीवर शहरातील नागरिक, प्रवाशांच्या वतीने खासदार भावना गवळी यांच्याकडे निवेदन सादर करून वाशिम रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलीस चौकी देण्याची मागणी करण्यात आली होती. खासदार भावना गवळी यांनी तातडीने याबाबत दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली. त्यानुसार दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त नांदेड यांना पत्र पाठवून तातडीने योग्य ती अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नागपूर येथील रेल्वे पोलीस अधीक्षकांना आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली. तथापि, वाशिम येथे तातडीने रेल्वे पोलीस चौकी स्थापन्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने नागपूर रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्याची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरती उपाययोजना म्हणून वाशिम येथे रेल्वे पोलीस कर्मचारी गुरुवारी नियुक्त केले आहेत. या ठिकाणी २४ तास रेल्वे पोलीस तैनात राहणार असून, दिवसाच्या कालावधीत दोन आणि रात्रीच्या वेळी दोन पोलीस येथे प्रवाशांसाठी राहणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसRailway Passengerरेल्वे प्रवासी