शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:55 IST

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली. 

ठळक मुद्देचाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले.

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली.  तब्बल १ कोटी ३४ लाख रुपये खर्च असलेल्या या योजनेमुळे मालेगावकरांची पाणीटंचाईची समस्या मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.  

मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान मोठे प्रकल्प आहेत. तथापि, चाकातिर्थ वगळता उन्हाळ्याच्या दिवसांत इतर प्रकल्प तळ गाठतात; परंतु चाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मंत्रालय स्तरावर त्या प्रस्तावाला १२ फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाली आणि या योजनेच्या कामासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मालेगाव शहरात असलेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता या योजनेचे काम युद्धपातळीवर होण्याची मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत होती. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मिनाक्षी सावंत, बबनराव चोपडे, तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती रामदास बळी, गजानन सारस्कर, रेखा अरुण बळी, अफसाना तस्लिम, अमोल सोनोने, उमेश खुळे, शशिकांत टनमने, तस्लिम सय्यद, किशोर महाकाळ, संतोष सुरडकर, संतोष जोशी, चंदू जाधव, डॉ. निलेश मानधने, संतोष बनसोड, प्रमोद हरने, मनोज सरदार आदि सर्व नगरपंचायत सदस्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

 

चाकातीर्थ ते कुरळा तातडीच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरात मिळाली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आज काम सुरु करण्यात आले आहे. १५ ते २० दिवसांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, मालेगाव 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव