मालेगाव (जि. वाशिम) : मेडशी येथे १४ मे रोजी सकाळी ८ चे दरम्यान दोन जणांमध्ये भांडण झाले. तक्रारीवरुन ८ जणांविरुद्ध १४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.किरकोळ कारणावरून कुर्हाडीने मारहाण करून त्याच्या वडिलांच्या डोक्यावर मार लागला, असे राजेश चंद्रकांत साठे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन समाधान साठे, महादेवराव साठे, विश्वास साठे, बांगरे या चार जणांवर गुन्हा नोंदविला.भांडण सोडवायला माझे वडील आले असता, वरील चार जणांनी लाथाबुक्कय़ांनी व घरातील कुर्हाडीने मारहाण करून माझ्या वडिलांचे डोक्यावर उजव्या बाजूने कुर्हाडीचा वार केल्याची तक्रार राजेश साठेने पोलिसात केली. तक्रारीवरुन चार जणांवर गुन्हा नोंद करुन घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.
भांडणप्रकरणी गुन्हे दाखल
By admin | Updated: May 15, 2015 00:40 IST