लोकजागर मंचचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी प्रसारमाध्यमे व सोशल मीडियातून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांंच्यावर झालेल्या आरोपांबद्दल लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी स्व. वाजपेयी यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख केलेला आहे. तथापि, ही बाब गंभीर असून वाकुडकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, कोषाध्यक्ष मिठूलाल शर्मा, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे, नगरपालिका सभापती गौतम सोनोने, प्रभाकर काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय पाटील-काळे, अॅड. राजेश विश्वकर्मा, अॅड. अनिकेत पोद्दार, अॅड. अवस्थी, सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक नवीन शर्मा, गणेश खंडाळकर, सुनील तापडिया, रामेश्वर ठेंगडे, नगरसेविका करुणा कल्ले, मोहन गोरे, भीमकुमार जीवणानी, रोहित चांदवाणी, कैलास मुगवाणकर, शुभम आढाव, राजू कलवार, रामप्रसाद सरनाईक, प्रभाकर पद्मणे, जगदीश देशमुख, गणेश जगताप, पद्माताई जगताप आदींची उपस्थिती होती.
वाकुडकर यांच्यावर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:37 IST