शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:53 IST

हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येही पोहचले होते; परंतू समन्वयातून यावर पडदा पडल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : नगर परिषदेला मिळालेला चार कोटी रुपयांचा निधी ऐनवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने नगर परिषदेच्या सत्ताधारी व विरोधी गटातील सदस्यांमध्ये रात्रीदरम्यान शाब्दीक वाद आणि त्यानंतर हाणामारी झाल्याने शनिवारी दिवसभर या प्रकरणाचीच चर्चा रिसोड शहरामध्ये होती. दरम्यान हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येही पोहचले होते; परंतू समन्वयातून यावर पडदा पडल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.रिसोड नगर परिषदेला विविध विकासात्मक कामांसाठी शासनाकडून चार कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळे या निधीमधून कोणती कामे करावयाची, याचे नियोजन नगर परिषदेच्या सत्ताधारी गटाकडून व पदाधिकाऱ्यांकडून सुरू असतानाच, चार कोटीचा हा निधी एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याची माहिती सत्ताधाºयांपर्यंत धडकली. यावरून नगर परिषदेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, ऐनवेळी हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याने सत्ताधारी संतप्त झाले. चार कोटी रुपयांच्या निधीमधून होणारी कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली होणार असल्याने आणि यावर नगर परिषदेचे नियंत्रण राहणार नसल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दीक वाद झाला. या वादाला ‘कमिशन’ची झालर असल्याची चर्चा नगर परिषदेसह शहरात चांगलीच रंगली आहे. रिसोड नगर परिषदेमध्ये सत्ताधारी व विरोधक असे दोन गट आहेत. गत आठवड्यापर्यंत रिसोड नगर परिषदेमध्ये सत्ताधारी व विरोधक एकाच बाकावर असल्याचे चित्र होते. सर्व काही आलबेल असल्याने निधी खर्चाबाबत कुठेही वाच्यता नव्हती. परंतू, चार कोटी रुपयांचा निधी ऐनवेळी वर्ग झाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली. शाब्दीक वादानंतर स्थानिक चांदणी चौकात सत्ताधारी व विरोधी गटातील काही सदस्यांमध्ये रात्रीच्या सुमारास हाणामारीही झाली. हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येही पोहचले. परंतू, नगर परिषदेतील निधीचा वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून काही पदाधिकाºयांनी मध्यस्थी करीत समन्वयातून या वादावर पडदा टाकण्यात यश मिळविले. दरम्यान, या घटनेची चर्चा शनिवारी दिवसभर शहरात रंगली होती.

पोलीस स्टेशनच्या आवारातही मारहाणसत्ताधारी पदाधिकाºयांनी हा निधी पालिकेच्या फंडात वळती करण्यासाठी आग्रह धरला होता. दरम्यानच्या काळात पदाधिकारी व लोकप्रतिनिधीमध्ये निधी वळती करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुध्दा झाली होती. परंतू अचानक हा निधी वळती झाल्याची माहिती मिळाल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद झाला. हा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर येथेही दोन नगरसेवकांमध्ये शाब्दीक बाचाबाची आणि मारहाण झाल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

 

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम