शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला अपघात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 20:42 IST

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील दोनद बु. गावाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला भीषण अपघात होवून नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी अपघातानंतर रास्तारोको आंदोलन करून रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देअपघातात नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी दोनद बु. जवळ खड्डयांमुळे झाला अपघात; संतप्त नागरिकांचा रास्तारोको!महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डा बाजार (वाशिम): नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील दोनद बु. गावाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला भीषण अपघात होवून नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी अपघातानंतर रास्तारोको आंदोलन करून रोष व्यक्त केला. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. याबाबत प्राप्त माहितीनुसार, दोनद बु. या गावाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडलेला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यास बांधकाम विभागाने जुमानले नाही. अशातच ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर येथील एक दाम्पत्य औरंगाबाद येथे कुटूंबासह मारुती सुझूकी सलेरियो या (क्रमांक एमएच ३१ एफ ए ०१६१) वाहनाने जात असताना ते खड्डयात आदळून भीषण अपघात झाला. यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यासोबतच पती-पत्नीसह एक वृद्ध इसम गंभीररित्या जखमी झाला. जखमींना तातडीने कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

 अपघातानंतर घटनास्थळी गोळा झालेल्या जमावाने रास्तारोको आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच धनज बु. पोलिस स्टेशनचे ठाणेदार मानकर यांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही याची कल्पना दिली. त्यानंतर तातडीने पावले उचलत बांधकाम विभागाने खड्डा बुजविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात