शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

वाशिम जिल्ह्यातील सहा शहरांमध्ये मुलभूत सुविधांचा बोजवारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:31 IST

वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांतर्गत नागरिकांना अपेक्षित मुलभूत सुविधा पुरविण्याकडे त्या-त्या नगर परिषदांचे दुर्लक्ष होत आहे. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते अशा सुविधांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा या चार नगर परिषद; तर मालेगाव आणि मानोरा येथे नगर पंचायत कार्यान्वित आहे.प्रमुख चौकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नल व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी अशा मुलभूत सुविधा मिळणे नागरिकांना अपेक्षित आहे. जिल्ह्यातील एकाही नगर परिषदेने ही सुविधा अद्याप उभी केलेली नाही.

वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांतर्गत नागरिकांना अपेक्षित मुलभूत सुविधा पुरविण्याकडे त्या-त्या नगर परिषदांचे दुर्लक्ष होत आहे. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते अशा सुविधांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातून विभक्त होत १ जुलै १९९८ रोजी वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. ७९३ महसूली गावे आणि सहा शहरे मिळून निर्माण झालेल्या या जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा या चार नगर परिषद; तर मालेगाव आणि मानोरा येथे नगर पंचायत कार्यान्वित आहे. दरम्यान, किमान शहरांच्या ठिकाणी प्रमुख चौकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नल व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी अशा मुलभूत सुविधा मिळणे नागरिकांना अपेक्षित आहे. मात्र, वर्षाकाठी या सुविधांकरिता शासनाकडून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी आणि नागरिकांकडूनही करापोटी वसूल केल्या जाणाºया निधीमधून ही कामे केली जात नसल्याची ओरड सर्वच स्तरांतून होत आहे. नगर परिषदांनी याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रसाधनगृहांअभावी महिलांची प्रचंड हेळसांडसमाजातील पुरूष मंडळी कुठेही आडोशाला जावून लघुशंका उरकू शकतात. मात्र, महिलांसाठी ही बाब कदापि शक्य नाही. त्यामुळे शहरांतर्गत वर्दळीच्या मुख्य चौकांमध्ये स्वतंत्र महिला प्रसाधनगृह असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही नगर परिषदेने ही सुविधा अद्याप उभी केलेली नाही. परिणामी, प्रसाधनगृहांअभावी महिलांची प्रचंड हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे.

‘सीसीटीव्ही’ उभारण्याकडे दुर्लक्ष!शहरांमधील मुख्य चौक आणि बाजारपेठांंमध्ये नागरिकांची नियमित वर्दळ राहते. गर्दीचा फायदा उचलून अनेक भुरटे चोरही सक्रीय असतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता चौक आणि बाजारपेठांमध्ये ‘सीसीटीव्ही’ असणे अत्यावश्यक आहे. मात्र, जिल्ह्यात या सुविधेलाही प्रशासनाकडून सपशेल ‘कोलदांडा’ दिला जात असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिम