शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संसर्ग टाळण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’; २० हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:15 IST

सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाऱ्या या रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्याने संभाव्य संसर्ग टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर जिल्हा प्रशासनाने ‘फिव्हर क्लिनिक’ची सुविधा उपलब्ध केली असून, या क्लिनिकमध्ये ४ जुलैपर्यंत जवळपास २० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाऱ्या या रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्याने संभाव्य संसर्ग टळला.संसर्गजन्य आजाराला वेळीच आवर घालणे, नागरिकांपर्यंत इत्यंभूत माहिती पोहचवून कोणती दक्षता घ्यावी याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी ६ जुलै रोजी जागतिक संसर्ग निवारण दिन साजरा करण्यात येतो. संसर्गजन्य आजारात एकूण तीन प्रकारचे आजार असून, यामध्ये किटकजन्य, हवेद्वारे पसरणारे आणि पाण्याद्वारे पसरणारे आजाराचा समावेश आहे. किटकजन्य आजारात तीव्र मेंदुज्वर, हिवताप, चिकुनगुन्या, डेंग्यू आदींचा समावेश आहे. हवेद्वारे पसरणाºया आजारात स्वाईन फ्लू, क्षयरोग, डांग्या खोकला, गोवर आदीचा समावेश आहे. दूषित पाण्याद्वारे तीव्र अतिसार व तत्सम आजार, कॉलरा, काविळ अ आणि एपोलिओ आदी आजार उद्भवतात. वाशिम जिल्ह्याचा विचार करता, हिवताप, डेंग्यू, क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, गोवर, अतिसार, काविट अ आणि ए आदी संसर्गजन्य आजार उद्भवतात. गतवर्षी स्वाईन फ्ल्यूचे सहा ते सात रुग्ण आढळले होते. चालू वर्षात तर कोरोना विषाणू संसर्गामुळे अन्य संसर्गजन्य आजारी रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. क्षयरोगाचे सध्या ५८६ रुग्ण असून, या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहे. क्षयरुग्ण तपासणीसाठी अत्याधुनिक मशिन्स् जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध असल्याने संसर्ग टाळण्याच्या दृष्टिने ती मोठी उपलब्धी आहे.दरम्यान, सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विशेष खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुकास्तरावर फिव्हर क्लिनिकची सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोनापूर्वीची लक्षणे ही सर्दी, ताप, खोकला आदी प्रकारातील असल्याने या क्लिनिकमध्ये केवळ सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाºया जवळपास २० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वांना वेळीच उपचार मिळाले. दुसरीकडे परगावावरून परतलेल्या ७० हजार नागरिकांमुळे कोणत्याही संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयांमध्ये ३ जुलैपर्यंत केली आहे. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, नागरिकांनीदेखील स्वत: सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांनी केले.  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या जात आहे. बाहेरगावावरून परतणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरू केले.- ऋषिकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या