शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’ काळात भागविली मोकाट श्वानांची भूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 10:45 IST

सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भुकेल्या श्वानांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या ४५ दिवसांपासून त्यांचे हे कार्य अविश्रांत सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या ४५ दिवसांपासून सर्वत्र संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. या काळात रस्त्यांवरील नाश्ता विक्रीच्या हातगाड्या, हॉटेल्स, रेस्टॉरंटही बंद असल्याने उष्टावळीवर जगणाऱ्या मोकाट श्वानांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भुकेल्या श्वानांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या ४५ दिवसांपासून त्यांचे हे कार्य अविश्रांत सुरू आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर २५ मार्चपासून संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लावण्यात आलेला आहे. तिसºया टप्प्यात ‘लॉकडाऊन’ १७ मे पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्वच ठिकाणचे कामधंदे ठप्प पडल्याने हातावर पोट असणाºया गोरगरिबांच्या कुटूंबात दोनवेळच्या जेवणाचे वांधे झाले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत वाशिममध्ये राजाभैया मित्रमंडळाच्या सदस्यांनी सामाजिक संवेदना जपत अन्नदानाचे कार्य हाती घेतले. भुकेल्या गोरगरिबांसोबतच रस्त्यावर फिरणाºया मोकाट श्वानांचेही पोट भरण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यानुसार, रोज रात्रीच्या सुमारास वाशिम शहरातीलर स्त्यांवर फिरून राजाभैया पवार, सुशील भिमजीयाणी, महादेव हरकळ, विक्रम बबेरवाल ही मंडळी ब्रेड, भात, बिस्कीट, पोळी याव्दारे श्वानांची भूक शमविण्याचा प्रयत्न करित आहेत. विशेषत: या सामाजिक कार्यात काही पोलिस अधिकाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला आहे.‘ग्रीन झोन’मध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्याला ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता मिळाली असून दुपारी दोन वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली; मात्र हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासंबंधी अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे रस्त्यांवर फिरणाºया मोकाट गायी, श्वानांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अशा स्थितीत शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रोज रात्रीच्या सुमारास मोकाट जनावरांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारली. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिम