शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Father's Day Special : रक्ताचे नाते नसलेल्या १५ अंधांचे पितृत्व स्वीकारणारा ‘पांडुरंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 12:22 IST

Father's Day Special: केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर १५ मुलांचे, त्यातही ते अंध मुलांचे जन्म न देता वडील झाले आहेत.

- नंदकिशाेर नारे

वाशिम : तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणारे, स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होत असताना केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर १५ मुलांचे, त्यातही ते अंध मुलांचे जन्म न देता वडील झाले आहेत. त्यांच्या पालन- पोषणसह शिक्षणाची जबाबादारी ते आवर्जून पार पाडत आहेत.पांडुरंग हे आपल्या गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना व अंध मुलगा चेतन यांच्या सोबत आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना, आपल्या अंध चेतनच्या समस्या पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचे कार्य हाती घेतले. पाहता- पाहता त्यांच्या झोपडीत १५ मुले जमा झालीत. सुरुवातील या सर्व मुलांचा सांभाळ करताना अतिशय कठीण दिवस काढावे लागलेत. आज अंध असताना पांडुरंग यांचे ते आधार झाले आहेत. या सर्वांनी आर्केस्टा काढला. लग्न समारंभ, सामाजिक उपक्रमांत शासकीय योजनांचा ते प्रचार- प्रसार करीत आहेत. रक्षाबंधनानिमित्त सर्व अंध मुले राख्या तयार करून विकताहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले; परंतु अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याने तीही वेळ निघून गेली. अनेक जण त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत.

 १५ अंधांचे पितृत्व स्वीकारणारा ‘बाप माणूस’

रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी व्यतीत करणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यामध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम! 

पालकत्व स्वीकारलेली मुलेदशरथ जोगदंड, कैलास पानबुडे, भरत खांडेकर, विजय खडसे, विकास गाडेकर, अश्विनी पवार, राधिका गाडेकर, अमोल गोडघासे, लक्ष्मी पानबुडे, गजानन खडसे, रूपेश हिरोळकर, मंगेश पुणेकर, रूपाली फुलसावंगे आदींचा समावेश आहे. ‘पेरलं ते उगवतं’, अशी एक मराठीत म्हण आहे, तसेच माझ्या काही बाबतीत घडले. माझ्या मुलापासून प्रेरणा मिळाल्याने ज्यांना कोणी सहारा देत नाही, अशा अंध विद्यार्थी, बालक, युवकांना मी सांभाळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कठीण प्रसंगातून न खचता व्यवस्था केली. आज तेच सर्व मला कुटुुंब चालविण्यास मदत करत आहेत. जिल्ह्यातच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रात या बालकांमुळे माझी ओळख झाली आहे. अनेक जण मला ‘अंधांचा वाली पांडुरंग’ म्हणूनही संबाेधतात.

-पांडुरंग उचितकर, केकतउमरा, ता. जि. वाशिम

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनwashimवाशिम